esakal | 'श्री'चे जागेवरच विसर्जन, पालिकेचा अनोखा उदगीर पॅटर्न
sakal

बोलून बातमी शोधा

उदगीर (जि.लातूर) : आजोबा गणपतीचे विसर्जन महाआरतीने सुरुवात करताना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रविण मेंगशेट्टी, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे आदी.

'श्री'चे जागेवरच विसर्जन, पालिकेचा अनोखा उदगीर पॅटर्न

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : शहरातील (Udgir) सार्वजनिक गणेशाचे आरती करून नगरपालिकेच्या वाहनात गुरूवारी (ता.१६) जागेवरच विसर्जन(Ganesh Immersion) करण्यात आले. या वर्षी नगरपालिकेच्या विसर्जनाचा अनोखा पॅटर्न राबवून विसर्जन शांततेत झाले. यावेळी पहिल्या व मानाच्या पारकट्टी गल्लीतील (Latur) आजोबा गणपतीच्या महाआरतीने श्री विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रविण मेंगशेट्टी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, पोलीस उपअधीक्षक डॅनियल बेन, उत्तरा कलबुर्गे,अनिता बिरादार, सरोज वारकरे यांच्या हस्ते महाआरती करून विसर्जनाला सुरुवात झाली.

हेही वाचा: PHOTOS : टोकाईगडावर पर्यावरणस्नेही वृक्ष गणेशाची स्थापना

यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत कुरूपखेळगे, उपाध्यक्ष सुभाष धनुरे, राजकुमार हुडगे, बबलु मुळे, मल्लेश झुंगा आदी यावेळी उपस्थित होते. या वर्षी कोरोनामुळे कुठलीही मिरवणूक काढण्यात येणार नसून नगरपालिकेच्या वतीने गणेश मंडळाच्या जागेवर जाऊन श्री विसर्जन करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने शहरातील गणेश विसर्जनासाठी अठरा ट्रॅक्टर सजवुन प्रत्यैक ट्रॅक्टरमध्ये प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन 'श्री'चे विसर्जन करण्यात आले. यासाठी मुख्याधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ट्रॅक्टरवर एक स्वच्छता निरीक्षक, पाच कर्मचारी, एक पुजारी व एक चालकाची व्यवस्था केली होती. यातच श्री विसर्जन करण्यात आले. कोरोनामुळे या वर्षी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत 'श्री'चे विसर्जन झाले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोरख दिवे यांनी चोख पोलीस बंदोबस्तात शहरातील ४७, तर शहरालगत २५ अशा एकूण ७२ मंडळाच्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

loading image
go to top