esakal | उत्साहाला आवर घालत विघ्नहर्त्याचं साताऱ्यासह कऱ्हाडात आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav

वाद्यांच्या तालावर शहर परिसरात लाडक्या गणरायाचे उत्साहात व भक्तीमय वातावरणात दरवर्षी आगमन होत असते. मात्र यंदा...

उत्साहाला आवर घालत विघ्नहर्त्याचं साताऱ्यासह कऱ्हाडात आगमन

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : ना ढोल-ताशा, झांज पथकाचा गजर, ना बॅण्ड- बॅन्जोचे वादन केवळ 'गणपती बाप्पा मोरया,....मंगलमूर्ती मोरया'च्या गजरात उत्साहाला आवार घालत आज कऱ्हाडवासिसांनी लाडक्या विघ्नहर्त्याची (Ganeshotsav 2021) उत्साहात प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सव मंडळांनीही कोरोनाचं (Coronavirus) भान ठेवून स्वतःहून उत्साहावर मर्यादा घालून बहुतांश ठिकाणी मंदिरात, खासगी जागेत मूर्तींची प्रतिष्ठापना केली.

गणेशोत्सव म्हंटलं की उत्साह ओसंडून वाहतो. वाद्यांच्या तालावर शहर व परिसरात लाडक्या गणरायाचे उत्साहात, भक्तीमय वातावरणात दरवर्षी आगमन होत असते. घरगुतीसह सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणरायाच्या मूर्तींच्या आगमनासाठी अबालवृध्दांत मोठा उत्साह दिसून येतो. मात्र, दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्या उत्साहावर विरझण आले आहे. मागील वर्षी तर फारच कडक नियमांत उत्सव साजरा करावा लागला. यंदा मात्र थोडी शिथिलता आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असल्याने पहिल्यासारखा उत्साह दिसून येत नाही.

हेही वाचा: आरतीपासून महाप्रसादापर्यंत राजकारण्यांची 'फिल्डिंग'

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती नेण्यासाठी येथील सोमवार पेठेतील कुंभारवाड्यासह रविवार पेठेतील कुंभार गल्लीत सकाळपासूनच गर्दी होती. वाहनांमुळे वाहतूक कोंडी होवू नये, यसाठी पोलिस यंत्रणेने त्याचे नियोजन केले होते. आजही त्यासाठी कन्याशाळा परिसरासह शहरातील विविध ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. कन्याशाळा ते कमानी मारूती मंदिर परिसरादरम्यान मात्र मोठ्या मूर्ती नेण्यासाठी येणारे ट्रॅक्टर व घरगुती मूर्ती नेण्यासाठी येणाऱ्या चारचाकी वाहनांसह रिक्षांच्या गर्दीने अनेकदा वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्याच्या लगत लावलेली वाहने वाहतूक कोंडीला निमंत्रण देत होती. सकाळच्या टप्प्यात घरगुती गणेश मूर्ती तर दुपानंतरच्या टप्प्यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती नेण्यास गर्दी केली होती.

loading image
go to top