esakal | गणेशोत्सवात निर्बंधाची शक्यता, तीन दिवसांत नियमावली
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवात निर्बंधाची शक्यता, तीन दिवसांत नियमावली

गणेशोत्सवात निर्बंधाची शक्यता, तीन दिवसांत नियमावली

sakal_logo
By
नामदेव कुंभार

लोकांची होणारी गर्दी पाहाता गणेशोत्सवाच्या काळात निर्बंधाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकार याची चाचपणी करत असून पुढील दोन ते तीन दिवसांत निर्बंधाची घोषणा होऊ शकते. मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवात साजरा केला जातो. संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहाता गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाची गणेशोत्सवात निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारकडून गर्दी टाळण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. सण-उत्सवाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलीही जाहीर केली आहे. मात्र, लोक नियम-अटी पाळताना दिसत नाहीत. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा निर्बंधाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवात साजरा केला जातो. बाजारांत गर्दी होते. संभाव्य धोका पाहता मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये अधिक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संकेतही दिले आहेत.

हेही वाचा: राणेंच्या वाहनावरील ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केले गंभीर आरोप

काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?

मुंबई आणि पुण्यासह अनेक मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत. पुढे सणासुदीचा काळ आहे. लोकांनी जास्त गर्दी करू नये, काही नवे निर्बंध लावण्यासाठी मुख्यमंत्री एक दोन दिवसात तज्ञांसोबत चर्चा करून निर्णय घेतील. काही नवे नियम लागू केले जाऊ शकतील, मात्र ते दोन तीन दिवसात निर्णय घेतले जातील. नाईट कर्फ्यु लावला जाणार नाही, तशी चर्चा ही आजच्या बैठकीत झालेली नाही,’ अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

loading image
go to top