Ganeshotsav 2022 : दगडूशेठ गणपतीचं अभिवादन करण्यासाठी केरळहून आलं असूर वाद्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : दगडूशेठ गणपतीचं अभिवादन करण्यासाठी केरळहून आलं असूर वाद्य

कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा गणेशोत्सवाला नव्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जीवनमान पूर्नपदावर येताना गणेशोत्सवात देखील वेगवेगळे उपक्रम मोठ्या उत्साहात होत आहेत. देशभरातल्या गणेशभक्तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर 'चमंडा ताल' हा वाद्य प्रकार गणपतीला सादर करण्यात आला.

केरळ मधील नादब्रम्ह कलावेधी या संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर चमंडा ताल हा वाद्य प्रकार सादर करून गणरायाला वंदन करण्यात आले. यापूर्वीदेखील हे वादन सादर करण्यात आले होते. पण यंदा कोविडच्या दोन वर्षांच्या काळानंतर सादर करण्यात आले.

नादब्राम्ह कलावेधीचे अध्यक्ष लतीश पुटटत्ता यांनी सांगितले की, हे असुर वाद्य असून याच्या ताल वादनाने मंदिरातील वातावरण मंत्रमुग्ध आणि प्रसन्न झाले. हे वाद्य फक्त देवाच्या समोर वाजवण्यास परवानगी असते अशी आख्यायिका असून येणाऱ्या भाविकांना सकाळीच या वादनाने आनंददायी ऊर्जा मिळाली. चमंडा ताल हा या वादनाचा प्रकार आहे हे तालावर वाजणारे वाद्य आहे.