
Ganeshotsav 2022: गणेशोत्सवात तांबे पितळाची भांडी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक
Copper And Brass Cleaning Tips : घरोघरी गणपती-गौरीच्या पूजेअर्चेसाठी घरातील पूजेची तांबे आणि पितळीची भांडी साफ करायची म्हणजे महिलांच्या नाकीनऊ येतात. पिंताबरीने भांडी साफ करायची म्हणजे पहिले तर हात खराब होतात आणि दुसरं म्हणजे तासंतास भांडी साफ करत बसावी लागतात. देवाच्या पितळेच्या मूर्ती असो किंवा पूजेची भांडी ही हवामानामुळे काळपट पडतात. सध्याच्या सणावाराच्या दिवसांमध्ये ठेवणीतली तांबे पितळाची भांडी असो किंवा रोजच्या वापरातली देवाची भांडी असो, झटपट साफ करायची ट्रीक आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.
काय आहे ट्रीक
या ट्रीक महिलांना घरात खूप उपयोगी पडत आहे. याची खासियत म्हणजे या ट्रीकसाठी बाजारातून काही विकत घेण्याची गरज नाही. घरातच असलेल्या तीन गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतात. चिंच, लिंबू आणि मीठ ही प्रत्येक घरात असते.
प्रथम गरम गॅसवर मोठ्या भांड्यात पाणी ठेवा. त्यात चिंचेच घाला आणि त्यात लिंबाचा रस घाला. या मिश्रणात मीठ घाला आणि यात काळपटलेली काळी पितळ तांब्याची भांडी घाला आणि या मिश्रणात ती चांगली उकळू द्या. काही मेहनत न करता थोड्या वेळाच ही भांडी अगदी चकचकीत दिसणार. गणपती-गौरीच्या पूजेसाठी भांडी एकदम तयार झाली आहे.
सोशल मीडियावर ही ट्रीक सांगण्यात आली आहे. अनेक महिला पितळेच्या काळ्या पडलेल्या मूर्तीसाठी टोमॅटो केचअप तर कधी पीठ, मीठ आणि व्हिनेगर या 3 पदार्थांचं मिश्रण वापरतात.