esakal | why vahana of lord ganesha is mouse | गणेशाचे वाहन मूषकच का?
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesha's vahana Mouse

गणेशोत्सव 2021 : गणेशाचे वाहन मूषकच का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव 2021 : पुराणात वर्णन केलेल्या सर्व देवी-देवतांचा विचार केल्यास प्रत्येक देवता कोणत्या तरी वाहनावर आरूढ असलेली दिसून येते. उदा. शंकर नंदीवर, कार्तिकस्वामी मोरावर, गणपती उंदरावर इत्यादी. या देवतांच्या वाहनांमागे काय रहस्य दडलेले आहे? गणपतीचे वाहन मूषकच का? (Ganeshotsav 2021 News)

हेही वाचा: एकवीस फुटी गणपती अन्‌ इराणी खण!

मूषक शब्दाचा विचार केल्यास हा शब्द ‘मूष स्तेये’ या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. या धातूचा संस्कृतमध्ये अर्थ ‘चोरी करणे’ असा आहे. मूषक अर्थात उंदीर ज्याप्रमाणे वस्तूंची चोरी करतो; परंतु पुण्य-पापाने बद्ध होत नाही. त्याप्रमाणे सर्व अंतर्यामी परमात्मा सर्व भोग भोगत असूनसुद्धा पुण्य-पापाने बद्ध होत नाही, असा त्याचा गुढार्थ आहे. त्याचप्रमाणे मूषकावर आरूढ असलेले गणपती देव हे मूषकस्वरूपी दुष्ट प्रवृत्तींचे दमन करीत आहेत, असाही सांकेतिक अर्थ व्यक्त होतो. म्हणूनच, ‘ईश्‍वरः सर्वभोक्ता च चोरवत्तत्र संस्थितः। स एव मूषकः प्रोक्तो मनुजानांः।।’ असे म्हटलेले आहे. 
- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

loading image
go to top