esakal | कोल्हापूर: गणेश मूर्तीवरील चांदीचे दागिने लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

CRIME

कोल्हापूर: गणेश मूर्तीवरील चांदीचे दागिने लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: टिंबर मार्केट राजाराम चौकातील मंडळाच्या मूर्तीवरील सुमारे ७० हजाराचे चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टिंबर मार्केट राजाराम चौक येथील ‘छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळ’ प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करत आहे. मूर्तीवर मंडळाच्या सदस्यांनी चांदीचे दागिने अर्पण केले आहेत.

हेही वाचा: देशव्यापी संपात अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार

दक्षतेसाठी रात्री मंडपात काही कार्यकर्तेही झोपले होते. दरम्यान पहाटे तीन ते साडेपाच यावेळेत चोरट्याने या दागिन्यांपैकी १२६० ग्रॅम वजनाचे तोडेवाळे, २०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या चार अंगठ्या असा ६८ हजार ६२० रूपयाचा ऐवज चोरून नेला. मात्र किरीटसह अन्य चांदीचे दागिने मात्र सुरक्षीत राहीले. हा प्रकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आला.

त्यांनी याची माहिती सभासदांसह पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने चोरट्याचा परिसरातील सीसी टीव्ही आधारे शोध सुरू केला. याबाबत मंडळातर्फे पृथ्वीराज नरके यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

loading image
go to top