ऑनलाईन मद्यविक्री करीत असाल तर सावधान! वाचा सविस्तर बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 12 April 2020

ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

मुंबई : ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घरपोच मद्यपुरवठा करण्याच्या जाहिराती "ऑनलाईन वाईन' व "ऑनलाईन लिकर' अशा मथळ्यांखाली समाज माध्यमांवर दिल्या जात आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल, असे सांगून भामटे फसवणूक करत आहेत. या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देश व राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यातील मद्यविक्री बंद असून, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्रीवर सतत कारवाई सुरू आहे. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

2281 गुन्ह्यांची नोंद 
अवैध मद्यविक्रीसंदर्भात राज्यात शुक्रवारी 147 गुन्हे नोंदवण्यात आले आणि 66 जणांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 11 वाहनांसह 30 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 24 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत राज्यात 2281 गुन्हे नोंदवून 892 जणांना अटक करण्यात आली. आतापर्यंत 107 वाहनांसह 5.55 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Online alcohol consumption is not allowed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online alcohol consumption is not allowed