नाशिकमधील सर्वात जुने आणि प्राचीन मंदिर : 'तिळा गणपती'

Tila Ganpati
Tila Ganpatiesakal

लेखक - सुनील शिरवाडकर.

नाशिक : गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास.

आज आपण जाणुन घेतोय ज्या बाप्पाला तिळगुळ दिल्याशिवाय नाशिककरांची संक्रांत पुर्ण होत नाही अशा 'तिळा गणपती' बाप्पाचा इतिहास.

असं म्हटलं जातं की नाशिकमधील सर्वात जुने, प्राचीन मंदिर म्हणजे तिळा गणपती मंदिर. अगदी काळाराम, कपालेश्वर मंदिराच्याही आधी याचे बांधकाम झाले आहे. या मंदिरामुळेच या भागाला गणेशवाडी हे नाव पडलेले आहे.

साधारण ७५० वर्षापुर्वीची गोष्ट. या भागातील एक रहिवासी श्री भडके (सोनार) यांच्या घराचे काम सुरू होते. नवीन घर बांधण्यासाठी पाया खणत असताना त्यांना जमीनीत ही मुर्ती सापडली. मग घर बांधत असतानाच घरासमोरील भागात एक सुंदर मंदिर बांधुन या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

या गणपती मंदिराची देखभाल आजही भडके (सोनार) कुटुंबाकडून आहे. मध्यंतरी त्यांनी या मंदिराच्या दुरुस्तीचे आणि डागडुजीचे काम केले. पण मंदिराच्या मुळ ढाच्याला अजीबात धक्का न लावता. अगदी जुन्या पध्दतीने गुळ, चुनखडी, रेतीचा वापर केला आणि मंदिर पुर्वीसारखे भक्कम केले.

गाडगे महाराज पुलावरुन आपण गणेश वाडीत जातो. उजव्या हाताला असलेल्या एका उंचवट्यावर हे मंदिर स्थित आहे. वीस बावीस पायऱ्या चढुन वर गेल्यावर आपल्या नजरेस हे मंदिर पडते. दगडी बांधणीच्या या भक्कम मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे. थोडे वाकुन आपण आत जातो. समोरच दिसतो हात जोडुन उभा असलेला... उपरणे पांघरलेला उंदीर. अजुन आत असलेल्या छोट्याशा गाभाऱ्यात आहे हा तिळा गणपती.

Tila Ganpati
जगाच्या कल्याणासाठी दिवसरात्र तप करण्यास बसलेला 'तपस्वी गणेश'

याला तिळा गणपती का म्हणतात?

एका आख्यायिकेनुसार ही मुर्ती तिळतिळ वाढत जाते म्हणून हा तिळा गणपती. पण खरं कारण तिळगुळाशी संबंधीत असावं. कारण पौष महीन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आपण तिळी चतुर्थी म्हणतो. या दिवशी जुन्या नाशिककरांचे पाय गणेशवाडीकडे वळतात. तिळगुळाचे लाडु, वड्या, हलवा या गणपतीला खुप प्रिय. त्याला तिळगुळ दिल्याशिवाय आपली संक्रांत पुर्ण होतच नाही.

दोन अडीच फुटांची ही गणेश मुर्ती. या दिवशी मुर्तीला छान सजवण्यात येतं. त्याचा मुळचा गोंडस, गोड चेहरा, डोळ्यातील मिश्कील भाव अधिकच खुलतात. त्याच्या पुढ्यातच तिळगुळाचा लाडु ठेवल्यावर वाटतं की आत्ता हा बाप्पा आपल्याशी गोड गोड बोलु लागेल.

Tila Ganpati
जेव्हा बाप्पा सर्वसमावेशकतेचं प्रतिक बनतो....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com