जगाच्या कल्याणासाठी दिवसरात्र तप करण्यास बसलेला 'तपस्वी गणेश'

Tapswi Ganesh Nashik
Tapswi Ganesh Nashikesakal

लेखक - सुनील शिरवाडकर.

नाशिक : गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास.

आज आपण जाणुन घेतोय दिवसरात्र जप करणाऱ्या आणि स्वतः गणरायाने आपले ठिकाण ठरवून आसनस्थ झालेल्या तपस्वी गणेशाचा इतिहास.

फार नाही...शंभर वर्षापुर्वीची गोष्ट. मराठे नावाचं एक सरदार घराणं होतं नाशकात. त्यांच्या घरात एक गणेश मुर्ती होती. पिढ्यानपिढ्या त्याचे पुजन होत होते. कालांतराने परिस्थिती अशी आली की त्यांच्याकडून गणपतीचं पुजन, सोवळं ओवळं काही सांभाळलं जाईना. त्यांनी निर्णय घेतला कि गणेश मूर्ती आता कोणाकडे तरी सुपुर्द करायची.

अनेकांनी इच्छा व्यक्त केली की मुर्ती आपल्याला मिळावी. कोणाला नाराज करण्याचा मराठ्यांचा स्वभावच नव्हता. मग त्यांनी ठरवलं. चिठ्ठ्या टाकुन निर्णय घ्यायचा.

एका बैठकीत सगळ्या इच्छुकांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या. एक चिठ्ठी उचलली... नाव आलं...शिवशंकर शौचे.

एकानं हरकत घेतली. पुन्हा चिठ्ठ्या टाकल्या... नाव आलं... शिवशंकर शौचे. एकुण तीन वेळा शौचे यांच्या नावाचाच कौल मिळाला.

शौचे परीवाराला आनंद होणं साहजिकच. त्यांनी अगदी हत्तीवरून मिरवत गणेश मूर्ती सोमवार पेठेत आणली. वाड्यात एका सुरेख गाभाऱ्यात त्याची स्थापना केली. प्रत्यक्ष शंकराचार्य डॉ.कुर्तकोटी, रामानंद बिडकर महाराज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

अखंड संगमरवरी पाषाणातुन बनवलेली ही सुबक मुर्ती. बसायला संगमरवराचाच अष्टकोनी चौरंग. डाव्या हातावर मोदकांची रास...न राहवुन त्यातल्या एक मोदक उचलुन सोंडेत धरलेला.

Tapswi Ganesh Nashik
दगडी मोदकाचा प्रसाद देणारे बाप्पा "मदन मदोत्कट"

हा गणेश जगाच्या कल्याणासाठी तप करण्यास बसलेला आहे. दिवसरात्र तो जप करतोय. त्याच्या उजव्या हातात असलेली जपमाळच याची साक्ष देत आहे. 'तपस्वी गणेश' असलेल्या या गणपतीचे सोवळे ओवळे सांभाळणे तसं कठीणच. पण शौचे परीवाराने त्याच्या सेवेत कुठेही कमीपणा येऊ दिला नाही.

गणेशाला आपण विद्येची देवताची म्हणतो. याच शौचे वाड्यात एका खोलीत पुरुषोत्तम शौचे यांनी विद्यादानाचे कार्य सुरु केले. कालांतराने त्याचा रविंद्रनाथ विद्यामंदिर नावाचा मोठा वटवृक्ष झाला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श होता रविंद्रनाथ टागोरांचा...आणि आशिर्वाद होता वाड्यातील तपस्वी गणेशाचा.

Tapswi Ganesh Nashik
पुणे : गुंडांचा गणपती...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com