esakal | मातीचा गणपती कसा ओळखाल? वाचा भन्नाट टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

Eco Friendly Ganeshotsav

मातीचा गणपती कसा ओळखाल? वाचा भन्नाट टिप्स

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : पर्यावरणपूरक गणपती मूर्ती (Eco friendly ganesh idol) म्हणून मातीच्या गणपतीची ओळख आहे. तर, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP)ची मूर्ती ओळखली जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्यावर्षी पीओपी मूर्तीवर बंदी आणून देखील या प्रकारातील मूर्ती हद्दपार होताना दिसत नाही. यावर्षी देखील हीच परिस्थिती आहे. मातीची मूर्ती शोधताना या काही टिप्स (tips to identify eco friendly ganesh idol) लक्षात ठेवा.

हेही वाचा: तीस गावात रुजणार 'एक गाव एक गणपती'

अनेक गणेश भक्त पर्यावरणीय दृष्टिकोन आणि मूर्ती विसर्जित करताना कुठलेही विघ्न येऊ नये म्हणून मातीच्या मूर्तीच्या शोधात असतात. मात्र, मूर्ती ओळखणे कठीण जात असल्याने मातीची मूर्ती असल्याचे सांगून विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जाते. मंगळवारी नागपूर महापालिकेकडून पाच झोनमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सुमारे १०६ दुकानांची तपासणी करण्यात आली. यातील ९० पीओपीच्या मूर्ती मनपाने जप्त केल्या. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेसुद्धा पीओपी गणपती मूर्ती म्हणून विक्री करण्यावर नुकताच साफ नकार दिला आहे. तरी देखील पीओपी गणपती मूर्ती विक्री अद्याप थांबली नाही, अशी माहिती प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्ती विरोधी कृती समितीचे संयोजक सुरेश पाठक यांनी दिली.

मूर्ती घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • मूर्तीच्या मागे छिद्र : पीओपी मूर्तीच्या तुलनेत मातीची मूर्ती तयार केल्यानंतर वाळायला वेळ लागतो. तयार केलेली मूर्ती आतमधून योग्य पद्धतीने सुकावी, भेगा पडू नये म्हणून मूर्तीला मागे एक छिद्र ठेवण्यात येते. तर, पीओपी मूर्तीला असे छिद्र पाहायला मिळत नाही.

  • प्रत्येक मूर्तीमध्ये विविधता : मातीची मूर्ती बनविताना पूर्णपणे साचा वापरला जात नाही. त्यामुळे, धडापासून मूर्तीचे सर्व अवयव दूरदूर दिसतात. मूर्तीवर असलेला उंदीरही चिकटलेला दिसत नाही. पीओपी मूर्ती साचा वापरून तयार करण्यात येत असल्याने उंदीर मूर्तीला पूर्णपणे चिकटलेला दिसेल.

  • लाकडी पाटाचा वापर : मातीची मूर्ती हाताने बनविण्यात येत असल्याने ती बनविताना शक्यतो लाकडी पाटाचा वापर केला जातो.

  • मूर्तीचे वजन : पीओपी मूर्ती हलकी व मातीची वजनदार असते. हे ओळख लपविण्यासाठी मूर्तीच्या तळात वजनदार वस्तू भरल्या जाते. अशा वेळी थोडे कोरल्यास आतील अवजड वस्तू नजरेस पडतील. पूर्ण मातीच दिसल्यास ती मूर्ती शुद्ध मातीची असेल.

  • मूर्तीची चमक : पीओपी मूर्ती अधिक चमकदार आणि मातीची कमी चमकदार दिसते. हा फरक निरखून पाहावा.

loading image
go to top