लोकमान्यांच्या स्फुर्तीने नावाजला राष्ट्रीय गणेशत्सोव 

राम चौधरी
Friday, 21 August 2020

असे म्हणतात कि महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. याच सुरवातीचा श्रीगणेशा वाशीमधे झाला. 102 वर्ष जुना असलेला राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचा गणपती वाशीमकरांचे दैवत झाले आहे. 

वाशीम: असे म्हणतात कि महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. याच सुरवातीचा श्रीगणेशा वाशीमधे झाला. 102 वर्ष जुना असलेला राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचा गणपती वाशीमकरांचे दैवत झाले आहे. 

भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे 8 फेब्रुवारी 2018 ला वाशीम दौर्यावर आले होते.  त्यावेळी कै.भाउसाहेब साने यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची शहरातून मिरवणूक काढली होती. मिरवणूकीनंतर वाशीममधे जंगी सभा झाली होती. या सभेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी राष्ट्रधर्मासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचे आवाहन केले होते. 

या आवाहनानुसार कै. भाउसाहेब साने, महिपत देशमुख, विनायकराव गोखले , अण्णासाहेब डबीर या मंडळींनी 1918 मधे भाऊसाहेब साने यांच्या माडीवर पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. या गणेशोत्सव मंडळाचे राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ असे नामकरण करण्यात आले. 

सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत असताना या गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. 1939 पासून राष्ट्रीय गणेशोत्सवाची सुरूवात टिळक स्मारक मंदिरात झाली  तेव्हापासून टिळक स्मारक भवन जिल्ह्यामध्ये गणेशत्सोव काळात वैचारिक मेजवानीचे ठिकाण ठरले आहे.

या गणेशापुढे आतापर्यंत बाबासाहेब खापर्डे, डाॅ.टेंभे,हिर्लेकर गुरूजी, य.खु. देशपांडे,  विश्वनाथ ब्रम्हचारी, विष्णू क्षीरसागर, बाबासाहेब पुरंदरे, ग.न.कोपरगावकर, श्री.न.जोशी, शेवडे गुरूजी, मुज्जफर हुसैन. या दिग्गजांनी  वैचारिक मेजवानीचे यजमानपद भुषविले. 

आजही परंपरा कायम 
या राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाकडून टिळक स्मारक भवनात मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा केला जातो. 102 वर्षाच्या परंपरेचे पालन आजही केले जाते. दहा दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी असते आजही हा गणेशोत्सव भारतीय परंपरेनेच केला जातो.
(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Ganpati Washimkars deity of Rashtriya Ganeshotsav Mandal