esakal | नैवैद्य बाप्पाचा: अननस मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

Pineapple_Modak

साहित्य:

सारणासाठी - तीन कप ओला खोवलेला नारळ, १ कप दूध, १ कप साखर, १ कप अननसाचे तुकडे, १ चिमूट पिवळा रंग, २-२३ थेंब अननस ईसेन्स, ड्रायफ्रूटचे तुकडे

आवरणासाठी - दोन कप तांदळाचे पीठ, २ टीस्पून मैदा, २ टीस्पून तूप, २ कप पाणी, मीठ चवीनुसार

आवरणासाठी- दोन कप तांदळाचे पीठ, २ टीस्पून मैदा, २ टीस्पून तूप, २ कप पाणी, मीठ चवीनुसार

नैवैद्य बाप्पाचा: अननस मोदक

sakal_logo
By
सुजाता नेरुरकर

साहित्य:

सारणासाठी - तीन कप ओला खोवलेला नारळ, १ कप दूध, १ कप साखर, १ कप अननसाचे तुकडे, १ चिमूट पिवळा रंग, २-२३ थेंब अननस ईसेन्स, ड्रायफ्रूटचे तुकडे

आवरणासाठी - दोन कप तांदळाचे पीठ, २ टीस्पून मैदा, २ टीस्पून तूप, २ कप पाणी, मीठ चवीनुसार

आवरणासाठी- दोन कप तांदळाचे पीठ, २ टीस्पून मैदा, २ टीस्पून तूप, २ कप पाणी, मीठ चवीनुसार

कृती - खोवलेला नारळ, दूध, साखर मिक्स करुन घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. त्यामध्ये पिवळा रंग, अननसाचे तुकडे, अननसाचा ईसेन्स व ड्रायफ्रूटचे तुकडे घालून मिक्स करुन बाजूला ठेवावे. एका कढईमध्ये २ कप पाणी गरम करुन त्यामध्ये मीठ व तेल घालून पाण्याला चांगली उकळी आणावी. मग त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा घालून मिक्स करुन कढईवर झाकण ठेऊन मंद विस्तवावर एक वाफ येऊ द्यावी. उकड आणलेले पीठ परातीत काढून घेऊन ओल्या हाताने चांगले मळून घ्यावे. त्याचे एकसारखे २१ लिंबाएवढे गोळे करुन हातावर पुरीसारखे थापावेत.

त्यामध्ये एक चमचा नारळाचे मिश्रण भरून पुरी बंद करावी व त्याला मोदकाचा आकार द्यावा. मोदकपात्रामध्ये २ ग्लास पाणी घालून चांगले गरम करुन घ्यावे. पाणी गरम झाल्यावर त्यावर चाळणी ठेऊन चाळणीवर केळीचे पान ठेऊन, चाळणीमध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे ठेवावे. वरुन परत केळीचे पान ठेवावे व मोदक पात्र बंद करुन १-१२ मिनिटे मोदकाला उकड आणावी. जोपर्यंत मोदकाला उकड येत आहे, तोपर्यंकत बाकीचे मोदक करुन घ्यावेत व त्यांना उकड आणावी. गरम गरम मोदक वर तूप घालून सर्व्ह करावेत.