रक्तदान हेच श्रेष्ठ दान, गणेशोत्सवात माणगर्जनाचे अव्वल स्थान

रक्तदान हेच श्रेष्ठ दान, गणेशोत्सवात माणगर्जनाचे अव्वल स्थान

गोंदवले (जि. सातारा) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उपक्रमांवर बंधने असली, तरी आपत्ती काळातील गरज ओळखून माणगर्जना गणेश मंडळाने रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला आहे. माण तालुक्‍यामधील गणेश मंडळांपैकी गोंदवले बुद्रुकमध्ये या मंडळाने या उपक्रमातून अव्वल स्थान मिळवल्याचे गौरवोद्‌गार दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी काढले.
 
शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने यंदा सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली आहेत. गणेशोत्सवातील कार्यक्रम विशेषतः दरवर्षीचा अन्नदान उपक्रम रद्द करून गोंदवले बुद्रुक येथील माणगर्जना गणेश मंडळाने सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सध्याच्या आपत्ती काळात रुग्णांना अत्यावश्‍यक असणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन सहायक पोलिस निरीक्षक श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने, आरोग्य अधिकारी डॉ. समिना तांबोळी, पोलिस पाटील आशा भोसले, अंगराज कट्टे, प्रवीण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

गुड न्यूज! कोरोनाकाळात केंद्राचा ग्रामपंचायतींना मोठा दिलासा; खात्यावर तब्बल 45 कोटींचा निधी जमा 
 
बालाजी रक्तपेढीचे डॉ. अमोल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या शिबिरात मंडळाच्या कार्यकर्त्यांसह 80 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सध्याच्या काळात अत्यावश्‍यक असणाऱ्या रक्ताची उपलब्धता करण्यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने तालुक्‍यातील पहिलाच उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी मंडळाचे कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष ओंकार नवले, उपाध्यक्ष नीलेश कट्टे, आशिष माने, भीमराव डाईगडे, संदीप नवले व कार्यकर्ते उपस्थित होते. विनोद मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com