

अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन करताना विधीवत पूजा करून मोदक, लाल फुल आणि दुर्वा अर्पण करावीत.
विसर्जनापूर्वी मूर्ती घरात फिरवून, कापूर लावून आरती करावी.
गणेश मंत्राचा जप करावा आणि विसर्जनाच्या वेळी मूर्तीचे तोंड घराकडे ठेवावे.
Ganesh Visarjan 2025: गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला म्हणजेच 6 सप्टेंबरला होणार आहे. या दिवशी गणरायाच्या मूर्तीचे विधीवत पूजा करून विसर्जन केले जाते. यावेळी कोणत्या गोष्टी करणे टाळल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
हिंदू धर्मात गणपतीला खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेश पुजनाने होते. यामुळे कामात यश मिळते. गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना तर अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचे विसर्जन होते.
गणपती बाप्पाला मोदक , लाल फुल आणि दुर्वा प्रिय आहे. बाप्पाला या गोष्टी अर्पण केल्यास प्रसन्न होतात आणि कायम कृपादृष्टी आपल्यावर ठेवतात.