
निलंगा, ता. ८ : १९७२ च्या दुष्काळात तयार झालेल्या या पाझर तलावाची गेल्या दीड वर्षापूर्वी या भागात झालेल्या अतिवृष्टीने पाझर तलावाच्या पाळूला गळती लागली होती शिवाय पाळूची वरची बाजू पूर्णपणे खचून गेल्याने मोठ्या भेगा पडल्यामुळे तलावाची धोकादायक परिस्थिती पाहता या प्रकल्पाची दुरुस्तीशिवाय पर्याय नव्हता म्हणून आता या तलावाचे काम सुरू करण्यात आले असून नवी झळाळी प्रकल्पाला मिळणार आहे.
दुष्काळी सालामध्ये तयार झालेल्या या पाझर तलावामुळे परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्याठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून तो तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे हा तलाव पूर्ण भराल्याने फुटणार अशी भीती परिसरातील गावामध्ये झाली होती. माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी तत्काळ पाटबंधारे विभागाला सुचना केल्या व सांढव्याद्वारे पाणी काढल्याने आजूबाजूच्या गावाला बसणारा मोठा अनर्थ टळला होता.
प्रशासनाच्या कामातील मंजूरीचा विलंब पाहता यंदाच्या हंगामात पाणी साठवणूक व्हावी यासाठी गावच्या पिण्याचे व शेतीचे सिंचनाचा विचार करून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी तत्काळ प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली.
या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी चार कोटी ९५ लाख रूपये लागणार असून ३५९ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. संपूर्ण प्रकल्पाची पाळू नविन तयार करण्यात येणार असून संबंधित विभागाकडून त्यांच्या कार्यालयाकडे असलेल्या मशिनद्वारे हे काम पूर्ण करण्यात येत आहे. यामुळे हाडगा, उमरगा, वडगाव, शिंदिजवळगा या गावचा शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.शासन, प्रशासनाच्या पाठपुरामुळे संबंधित तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. काम पूर्ण करून यंदाच्या हंगामात पाणी साठवण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या कामाला झाला प्रारंभ
या प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन भाजपाचे निलंगा विधानसभा प्रभारी दगडू साळुंके , भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, संपत पाटील, जलसंपदा लाभक्षेत्र विभाग कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, उपअभियंता आर .के.पाटील, सहाय्यक अभियंता दत्ता कोल्हे ,अभियंता अजय जोजारे, आर.आर.शिंदे, योगेश बिराजदार, उदय भोसले हाडगा गावचे परशुराम वाघमारे, कुमार दरेकर, उत्तम लासूणे, योगेश्वर वाघमारे, गहिनीनाथ किल्लारे, राम होगाडे,आशीष वाघमारे, ज्ञानेश्वर नरवटे, किशन कुलकर्णी, सलीम शेख, केदार मोरे, प्रकाश वाघमारे, इंद्रजित वाघमारे, सतीश स्वामी,नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.