Ganesh Chaturthi 2023: लालबागच्या राजापासून ते दगडुशेठ हलवाई गणपतीपर्यंत, पाहा पुणे-मुंबईतील एकापेक्षा एक आकर्षक डेकोरेशन

गणेशोत्सव बाप्पाच्या भाविकांसाठी महत्त्वाचा असतो. कारण यानिमित्ताने बाप्पाच्या स्वागतासाठी केलेले तयारी ते सजावटीपर्यंत साऱ्याच गोष्टींची भावना काही औरच असते.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Sakal

गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया!

आता गल्लोगल्ली आणि घराघरांत बाप्पाचा हा जयघोष ऐकायला मिळत आहे. वर्षभर बाप्पाच्या आगमनाची वाट पाहिल्यानंतर अखेर १९ सप्टेंबरला लाडक्या बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात जल्लोषात भाविकांनी दणक्यात स्वागत केलं. संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाचा हा उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. 

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : या वर्षी ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या

या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक व हटके डेकोरेशन. गणपती मंडळ वेगवेगळ्या विषयांनुसार बाप्पाच्या मूर्तीभोवती सजावट करतात. हल्लीच्या भाषेत सांगायचे झाले तर डेकोरेशन ट्रेंडनुसार किंवा एखाद्या विषयाला धरून थीमनुसार केले जाते आणि गणेशोत्सवासाठी केलेली ही सजावट सणाचे महत्त्व देखील वाढवते.

Ganesh Chaturthi 2023
Jalna Ganeshotsav : ‘अनोखा’ची १०७ किलो चांदीची श्री मूर्ती

मुंबई तसेच पुण्यामधील गणपती मंडळांचे देखावे खरंच पाहण्यासारखे असतात. चला तर या लेखाच्या माध्यमातून मुंबई-पुण्यातील गणपती मंडळांनी केलेल्या हटके सजावटीची माहिती जाणून घेऊया. 

Ganesh Chaturthi 2023
Lord Ganesha : गणेशाला ‘गज’ मुखच का?

लालबागचा राजा (मुंबई) (Lalbaugcha Raja, Mumbai)

लालबागच्या राजाची ख्याती संपूर्ण देशभर पसरली आहे. लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्य तसंच देशभरातून भाविक येथे रांगा लावून बाप्पाच्या चरणी आपला माथा टेकतात. दुसरीकडे दरवर्षी या बाप्पासाठी हटके पद्धतीने थीम बेस्ड डेकोरेशनही केलं जाते.  यंदा लालबागच्या राजा गणेश मंडळाने (Lalbaugcha Raja 2023) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा आहे. 

मुंबईचा राजा (गणेशगल्ली, लालबाग) (Mumbaicha Raja Ganesh Galli)

मुंबईतील प्रसिद्ध गणपती गणेश गल्ली या ठिकाणी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी पहिल्याच दिवसापासून गर्दी केलीय. 

 मुंबईचा श्रीमंत गणपती

मुंबईतील श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी सेवा मंडळ प्रसिद्ध आहे. हा गणपती सजावटीसाठी नाही पण बाप्पाच्या सोन्याच्या आभूषणांसाठी प्रसिद्ध आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या बाप्पाची मूर्ती पूर्णतः शाडूच्या मातीने साकारली जाते. 

खेतवाडीचा राजा (Khetwadicha Raja, 12th lane of Khetwadi)

गेल्या कित्येक वर्षांमध्ये या गणेश मंडळाच्या माध्यमातून भाविकांना बाप्पाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळाले आहेत. हे मंडळ देखील आपल्या हटके व आकर्षक सजावटीसाठी ओळखले जाते. यासाठी मंडळाने आजवर अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत.  

दगडुशेठ हलवाई गणपती (पुणे) (Dagadusheth Halwai Ganpati, Pune)

गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात भव्यदिव्य व डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक अशी सजावट पाहायला मिळते. यंदा मंदिर परिसरात प्रसिद्ध राम मंदिराचा देखावा भाविकांना पाहायला मिळतोय.  

कसबा पेठ गणपती, पुणे

मंत्रोच्चारात, गणरायाच्या जयघोषात, भक्ती रसात तल्लीन होऊन भाविकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीचे दर्शन घेतले.

तुळशीबाग गणपती, पुणे (Tulshibaug Ganpati, Pune)

पुण्यातील तुळशीबागेतील गणपती आपल्या पारंपरिक आणि भव्यदिव्य सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. यंदाही गणेश मंडळाने भव्यदिव्य व सुंदर राजवाडा उभारल्याचे आपण पाहू शकता.

गुरूजी तालीम गणपती, पुणे

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती देखील पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मंडळाने भव्यदिव्य असा देखावा साकारला आहे.

अखिल मंडई मंडळ,पुणे

या गणपती मंडळाने यंदा फुलांचा सुंदर देखावा साकारला आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com