Ganesh Chaturthi 2023 Prasad
Ganesh Chaturthi 2023 PrasadSakal

Ganesh Chaturthi 2023 Prasad : शास्त्र प्रसादाचे - राजगिऱ्याचे लाडू

Ganesh Chaturthi 2023 Prasad रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी प्रसादामध्ये वापरण्यात येणाऱ्या राजगिऱ्याचे महत्त्व खूप आहे.
Published on

- राधिका शहा, आहारतज्ज्ञ, एलओसी

राजगिरा, गूळ आणि शेंगदाणे यांच्यापासून तयार केलेला राजगिऱ्याचा लाडू किंवा गुडदाणी हा अत्यंत चांगला पौष्टिक घटक आहे. गणेशोत्सव हा पावसाळ्यात येतो. या काळात वातावरणात आर्द्रता अधिक असते. त्यामुळे विविध आजार पसरवणारे रोगजंतू हवेत पसरत असतात. 

त्याविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी प्रसादामध्ये वापरण्यात येणाऱ्या राजगिऱ्याचे महत्त्व खूप आहे.

Ganesh Chaturthi 2023 Prasad
Ganesh Chaturthi 2025 : भगवान गणेशाला लाल रंग प्रिय का? वाचा सविस्तर

राजगिरा

राजगिरा हा पौष्टिक घटक आहे. यात मॅग्नेशिअम, लोह, तांबे, व्हिटॅमिन डी, झिंक असे शरीरासाठी आवश्यक पोषक घटक असतात.  यात कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्याने शरीराची हाडे बळकट होतात, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना यातील फायबर व व्हिटॅमिनचा विशेष फायदा होतो. सूज कमी करण्यासाठीही हे घटक उपयुक्त ठरतात. 

Ganesh Chaturthi 2023 Prasad
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला? जाणून घ्या कथा

शेंगदाणे

शेंगदाणे हा तेलबिया वर्गातील घटक आहे. त्याचे तेल हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. मात्र त्याचे सेवन कमी प्रमाणात करावे. शेंगदाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे प्रसादाच्या माध्यमातून हे पोषक घटक शरीराला मिळतील, असे यामागचे आहारशास्त्र आहे.

Ganesh Chaturthi 2023 Prasad
Ekdant Ganesh Story In Marathi : श्री गणेशाचा दात कोणी तोडला? बाप्पाच्या एकदंत नावामागील जाणून घ्या रहस्यकथा

गूळ 

गूळ हा साखरेपेक्षा आरोग्यास पोषक असतो. साखरेतून शरीराला फक्त ऊर्जा मिळते. पण गुळाच्या सेवनामुळे ऊर्जेबरोबर लोह, काही प्रकारचे व्हिटॅमिन्सही मिळतात.

त्यामुळे राजगिरा, गूळ, दाणे एकत्रित करून तयार केलेली गुडडाणी, लाडू हे शरीरासाठी सर्वोत्तम पोषणमूल्य देणारा पदार्थ ठरतो. लोहाचे प्रमाण कमी किंवा रक्तक्षय असणाऱ्या रुग्णांना राजगिऱ्याचा लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण रक्तवाढ, हाडांमधील ताकद वाढवण्याचे गुणधर्म हा मिश्रणामध्ये आहे. याचे महत्त्व प्रसादापुरतेच मर्यादित नाही.   

तरूण मुला-मुलींना याचा फायदा होतो. अर्थात वजन जास्त असणाऱ्यांनी फक्त राजगिरा न खाता दूध आणि राजगिरा आहारात घेतला तरी उपयुक्त ठरेल. यात काही अक्रोड, बदामाचे काप मिक्स करून राजगिऱ्याची खीरही करता येईल. मधुमेह किंवा नजन जास्त असणाऱ्यांनी शुगर फ्री घटक घालून अशा प्रसादाचे सेवन करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com