Ganesh Chaturthi 2025 : भगवान गणेशाला लाल रंग प्रिय का? वाचा सविस्तर

Ganesh Chaturthi 2025 : गणेशास लाल रंगाचे फूल, लाल वस्त्र अर्पण केले जाते. कारण…
Ganesh Chaturthi 2025
Ganesh Chaturthi 2025Sakal
Updated on

- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

Ganesh Chaturthi 2025 : गणेशास लाल रंगाचे फुल, लाल वस्त्र अर्पण केले जाते. तसेच गणेश मूर्तीचा रंग लाल का असावा! किंबहुना गणेशास लाल रंग जास्त प्रिय का आहे? अथर्वशीर्षात 'रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्l रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्ll' असे वर्णन आलेले आहे. 

अर्थात लाल वस्त्र, लाल गंध, लाल फुले इत्यादी लाल रंगाच्या गोष्टी गणेशास प्रिय आहेत, असे अथर्वशीर्षावरून दिसून येते. याचे कारण असे की, गणपतीचा वास देहामध्ये मूलाधार चक्रामध्ये आहे, असे अथर्वशीर्ष सांगते. जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनुसार मनुष्यदेहातसुद्धा देवतांचा वास विशिष्ट ठिकाणी असतो, असे योगशास्त्र सांगते. 

'किंच हेमनिभे चक्रे मूलाधारे चतुर्दलेl

गणेशोस्ति तथाचक्रे स्वाधिष्ठानकसंज्ञकेll

षड्दले विद्रुमाकारे ब्रह्मास्ति मणिपूरकेl

द्विपंचदलसंयुक्ते नीलवर्ण स्थितो हरि: ll'

अर्थात आपल्या देहात सहा प्रकारची चक्रे अस्तित्वात आहेत. योगशास्त्रानुसार मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र अशी ती षट्चक्रे आहेत. षट्चक्रांमधील मूलाधार चक्रात गणेशाचे, स्वाधिष्ठान चक्रात ब्रह्मदेव, मणिपूर चक्रात विष्णू इत्यादी देवतांचा वास असते. 'त्वं मूलाधारस्थितोसि नित्यम्' असे अथर्वशीर्षात म्हटलेले आहे.

मूलाधार चक्रात श्री गणेशाचे वास्तव्य आहे. मूलाधार चक्राचा योगशास्त्रीय दृष्ट्या विचार केल्यास मूलाधार चक्रामध्ये जे स्वस्तिक आहे, असे सांगितलेले आहे, त्या स्वस्तिकाचा रंग लाल असतो. तसेच 'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ' या गणेशाच्या ध्यानामध्ये देखील उगवत्या कोटी सूर्यांप्रमाणे लाल रंगाचा गणेश असे वर्णन आलेले असल्यामुळे गणेशास लाल रंग अत्यंत प्रिय आहे. 

Q

भगवान गणेशाला लाल रंग का प्रिय आहे?

A

उत्तर: लाल रंग हा शक्ती, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार, लाल रंग भगवान गणेशाच्या तेजस्वी आणि शुभ स्वभावाशी संबंधित आहे. यामुळे गणेश चतुर्थीला त्यांना लाल फुले, वस्त्रे आणि सजावट अर्पण केली जाते.

Q

गणेश चतुर्थीला लाल रंगाचा वापर कसा केला जातो?

Attribution

A

उत्तर: गणेश चतुर्थीला लाल रंगाचे फूल (जसे, हिबिस्कस), लाल वस्त्रे, लाल चंदन आणि लाल रंगाच्या मिठाया (जसे, लाल पेढे) गणपतीला अर्पण केल्या जातात. तसेच, मंडप आणि सजावटीतही लाल रंगाचा वापर केला जातो.

Q

लाल रंगाचा गणपतीच्या पूजेत आध्यात्मिक अर्थ काय आहे?

A

उत्तर: लाल रंग हा आध्यात्मिक दृष्ट्या शुद्धता, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. गणपतीच्या पूजेत लाल रंगाचा वापर भक्तांच्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणि विघ्नहर्ता गणेशाची कृपा मिळवण्यासाठी केला जातो.


Q

गणेश चतुर्थीला लाल रंगाशी संबंधित कोणत्या परंपरा पाळल्या जातात?

A

उत्तर: गणेश चतुर्थीला भक्त लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात, गणपतीला लाल फुलांचे हार अर्पण करतात आणि लाल रंगाच्या सजावटीने मंडप सजवतात. तसेच, लाल रंगाच्या प्रसादाचे वाटपही केले जाते, जे भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com