Ganesh Chaturthi 2025sakal
Ganesh Chaturti Festival
Ganesh Chaturthi 2025: या मंदिरात असलेल्या स्वयंभू गणपतीच्या मूर्तीवर नांगराची खूण कशी काय पडली?
Unique Ganpati Statue And Temple In Ahilyanagar: आपल्याच राज्यात आहे निद्रावस्थेतील स्वयंभू गणेश, पण कुठे?
Swayambhu Ganesha Temple In Ahmednagar: भारतात श्री गणेशाची अनेक मंदिरे आहेत. अनेक गावांचा तो ग्रामदैवतही आहे. श्री गणेशाची अनेक मंदिरे प्रसिद्धही आहेत. भारतातील एका मंदिरात तर तोंड नसलेल्या गणपतीची पूजा केली जाते. तर आपल्या राज्यात असंही एक मंदिर आहे जिथे स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे.
तसे, देशभरात अनेक मंदिरातील बाप्पा स्वयंभू आहे. यामध्ये गणपतीपुळ्याच्या गणपतीचाही समावेश आहे. तसंच, अहिल्यानगर जिल्ह्यात असलेला गणेशा खास आहे. कारण, तो स्वयंभू तर आहेच पण त्याचसोबत तो निद्रावस्थेत आहे. निद्रावस्थेत असलेल्या गणेशाचे हे एकमेव मंदिर आहे. याच मंदिराचा इतिहास अन् पौराणिक महत्त्व जाणून घेऊयात.