esakal | शतकी परंपरा असलेला टेंबे गणपती
sakal

बोलून बातमी शोधा

टेंबे गणपतीची मूर्ती.

माजलगाव - शहरातील एक शतकाची परंपरा असलेल्या टेंबे गणपतीची मूर्ती ही पर्यावरणपूरक असते.

शतकी परंपरा असलेला टेंबे गणपती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गणेशोत्सव: माजलगाव - शहरातील एक शतकाची परंपरा असलेल्या टेंबे गणपतीची मूर्ती ही पर्यावरणपूरक असते. शहरातील श्रीराम मंदिरात टेंबे गणपतीची स्थापना केली जाते. निजामकालीन राजवटीत या गणेशाची स्थापना मिरवणूक परवानगीच्या कारणावरून अडविण्यात आली होती. हैदराबाद येथे घोड्यावर जाऊन गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ताम्रपटावर रीतसर परवाना आणला होता. यामुळे या गणेशाची स्थापना भाद्रपद एकादशीला म्हणजेच सोमवारी (ता. नऊ) करण्यात येणार आहे. मागील १२० वर्षांपासून या मंडळाचे सदस्य पर्यावरणपूरक गणेश मंडळाच्या मूर्तीची स्थापना शहरातील श्रीराम मंदिरात करतात. गणेशोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. विसर्जन मिरवणुकीमध्ये सामाजिक, धार्मिक, पौराणिक देखावे सादर केले जातात. पाच दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात टेंबे गणपतीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून भाविक गर्दी करतात.

असे पडले ‘टेंबे’ नाव
निजामकाळात १९०१ मध्ये विजेची सुविधा नसल्याने श्री विसर्जन मिरवणुकीत उजेड असावा म्हणून भाविक प्रकाशासाठी टेंबे धरत असत. यानंतर काहीजण नवसपूर्ती व वंशवृद्धीसाठी मानाचे टेंबे घेऊन मिरवणुकीत सहभागी होत. त्यामुळे या मंडळाला ‘टेंबे गणपती’ असे नाव पडले आहे.

go to top