Ganeshotsav 2022 : पुण्यातील प्राचीन गणेशमंदिरे जाणून घ्या माहिती - Photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav : कसबा गणपती पुण्याचे ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती ओळखला जातो

Ganeshotsav 2022 : पुण्यातील प्राचीन गणेशमंदिरे जाणून घ्या माहिती - Photo

गणेशोत्सव... भारतीय संस्कृतीतील ऊर्जा वाढविणारा उत्सव. कुणासाठी विघ्नहर्ता, सुखकर्ता, कुणासाठी दुःखहर्ता, तर लहान मुलांसाठी लाडका बाप्पा. बुधवारपासून या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया पुण्यातील प्राचीन गणेश मंदिरांबाबत...

त्रिशुंड्या गणपती (सोमवार पेठ)
तीन सोंड असल्याने त्रिशुंड या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे.

त्रिशुंड्या गणपती (सोमवार पेठ) तीन सोंड असल्याने त्रिशुंड या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे.

मातीचा गणपती (नारायण पेठ)
 कै. शिवरामपंत श्रोत्री यांना मुठा नदीतून वाहत आलेल्या मातीत ही मूर्ती मिळाली, म्हणून यांस मातीचा गणपती म्हणतात.

मातीचा गणपती (नारायण पेठ) कै. शिवरामपंत श्रोत्री यांना मुठा नदीतून वाहत आलेल्या मातीत ही मूर्ती मिळाली, म्हणून यांस मातीचा गणपती म्हणतात.

मोदी गणपती (नारायण पेठ)
 या मंदिराचे नाव श्री सिद्धिविनायक मंदिर होते, पण नंतर मोदी बागेत मंदिर असल्याने ‘मोदी गणपती’ असे नाव रूढ झाले.

मोदी गणपती (नारायण पेठ) या मंदिराचे नाव श्री सिद्धिविनायक मंदिर होते, पण नंतर मोदी बागेत मंदिर असल्याने ‘मोदी गणपती’ असे नाव रूढ झाले.

तळ्यातला गणपती (सारसबाग)
सारसबागेतील गणपती हा तलावाच्या बेटावर असल्याने ‘तळ्यातला गणपती’ म्हणून ओळखला जातो.

तळ्यातला गणपती (सारसबाग) सारसबागेतील गणपती हा तलावाच्या बेटावर असल्याने ‘तळ्यातला गणपती’ म्हणून ओळखला जातो.

गुंडाचा गणपती (कसबा)
पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता, ‘त्याच्या घराजवळील गणपती’ म्हणून हा ‘गुंडाचा गणपती’ नावाने प्रसिद्ध आहे.

गुंडाचा गणपती (कसबा) पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता, ‘त्याच्या घराजवळील गणपती’ म्हणून हा ‘गुंडाचा गणपती’ नावाने प्रसिद्ध आहे.

श्री वरद गुपचूप गणपती (शनिवार पेठ)
चिंचवड येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी १८९२ मध्ये या देवस्थानाची उभारणी केली.

श्री वरद गुपचूप गणपती (शनिवार पेठ) चिंचवड येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी १८९२ मध्ये या देवस्थानाची उभारणी केली.

दशभुजा गणपती (कोथरूड)
पुण्यात दशभुजा गणेशाच्या एकूण तीन मूर्ती आहेत, त्यापैकी कोथरूडची ही मूर्ती सर्वांत मोठी आहे.

दशभुजा गणपती (कोथरूड) पुण्यात दशभुजा गणेशाच्या एकूण तीन मूर्ती आहेत, त्यापैकी कोथरूडची ही मूर्ती सर्वांत मोठी आहे.

फडके गणपती (सिंहगड रस्ता)
सरदार फडके यांनी स्थापन केल्यामुळे हे मंदिर ‘फडके गणपती’ म्हणून ओळखले जाते.
हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने आहे

फडके गणपती (सिंहगड रस्ता) सरदार फडके यांनी स्थापन केल्यामुळे हे मंदिर ‘फडके गणपती’ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने आहे

चिमण्या गणपती (सदाशिव पेठ)
पूर्वीच्या काळी या गणपतीपुढे तांदूळ टिपण्यासाठी खूप चिमण्या येत असत, त्यामुळे या गणपतीला ‘चिमण्या गणपती’ असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे.

चिमण्या गणपती (सदाशिव पेठ) पूर्वीच्या काळी या गणपतीपुढे तांदूळ टिपण्यासाठी खूप चिमण्या येत असत, त्यामुळे या गणपतीला ‘चिमण्या गणपती’ असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे.

Web Title: Ganeshotsav 2022 Pune Ganesh Chaturthi Festival Ancient Temple History

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..