Ganeshotsav 2022 : मुषकाने भक्ताचा संदेश बाप्पापर्यंत पोहचवला, गणेशाने केली किमया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : मुषकाने भक्ताचा संदेश बाप्पापर्यंत पोहचवला, गणेशाने केली किमया

गणेशाचा सर्वांत जवळचा मित्र म्हणजे कोण अस आपल्याला विचारलं तर त्याचे वाहन मुषक असे आपण सांगतो. असं म्हटलही जात कि आपल्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या सर्व मुषक राजाच्या कानात सांगितल्या कि तो त्या गणेशापर्यंत पोचवत असतो. अशाचप्रकारे एका भक्ताचा संदेश मुषकाने गणेशापर्यंत पोचवला आणि बाप्पाने आपल्या किमयेने त्याला दर्शन दिले. भक्ताची अशी कोणती इच्छा गणेशाने आपल्या किमयेने पुर्ण केली ते जाणून घ्या.

पुर्वी एका खेडे गावात एक सदु नामक तरुण राहात होता. सदू हा गणेशाचा निस्सीम भक्त होता. फारस काही शिक्षण न झालेला सदू गावात पडेल ते काम करत असे. अगदी कोणी म्हणाल आज शेतात नांगर हाक तर ते, तर कोणी म्हणेन आज स्वयंपाक कर तर तेही सदू करत असे. गावातील बहुतांश लोक सदुकडून हमाली आणि मजुरीचे काम करुन घेत असत. सदूही मिळेल ते काम कुठलीही तक्रार न करता पुर्ण करत असे. मात्र गावातील लोक त्याला कधीही त्याच्या कामाच पुर्ण मोबदला त्याला देत नसत. याउलट त्याने केलेल्या कामात काहीतरी चुक काढून त्याच्यावरच ओरडत. सदू मात्र शांतपणे सर्वकाही ऐकुन घेत असे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: गणपती अथर्वशीर्ष पठणाचे 'हे' नियम माहित्येत?

एके दिवशी गावातील प्रमुखाच्या घरात सदूला धान्य ठेवण्याचे काम सांगण्यात आले. सदूने नेहमीप्रमाणे सांगितलेले काम केले आणि तो आपल्या घरी निघून गेला. काही वेळाने त्या प्रमुखाचा एक माणूस सदूच्या घरी आला आणि त्याला दम देत म्हणाला तुला मालकांनी बोलवलं आहे. आत्ताच्या आमच्या बरोबर चल. सदू त्यांच्यासोबत गेला. सदूने ज्या भांडार खान्यात धान्य ठेवले होते ते उंदरांनी उच्छाद मांडला होता. आणि सर्वकाही सदूच्याच चुकीमुळे झाले असे त्या गाव प्रमुखाचे म्हणने होते. त्यामुळे गाव प्रमुखाने त्याच भांडारखान्यात उंदरामध्ये सदूला रात्रभर कोंडून ठेवा असे सांगितले. गरीब सदू काहीही न बोलता त्या भांडार खान्यात जाऊन निपचीत पडून राहीला. उंदीर सदूच्या अंगावरून येजा करीत होते. सदू मनातल्या मनात रडू लागला आणि स्वतःच्या आयुष्याला दोष देत मी काहीही न करता असे माझ्याच वाट्याला का येते असे म्हणू लागला. आणि आता मला हे असे जिवन जगण्यात काहीही रस नाही. मी स्वतःचे जिवन संपवणार असे त्याने ठरविले. त्याचे हे विचार त्या उंदरांमधील एका उंदराने ऐकले. तो उंदीर म्हणजे गणपती बाप्पाचे वाहन मुषकराज होते.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : भाद्रपद चतुर्थीला का घेवू नये चंद्राचे दर्शन, हे आहे कारण

हे सर्वकाही त्यांनी बाप्पाला सांगितले. त्याच क्षणी बाप्पाने गावप्रमुखाच्या स्वप्नात जावून सांगितले ज्या सदूला तू आज शिक्षा केली आहे त्याला तू उद्या सुर्योदयावेळी यथोचित सन्मानाने मुक्त करावे आणि त्याला त्रास दिल्याबद्दल अन्न धान्यासह त्याच्या कामाचा जेव्हढाही मोबदला आजपर्यंत तुम्ही गावकऱ्यांनी त्याला द्यावा असे न केल्यास मी तुम्हा सर्वांना दंडीत करेन. गणपती बाप्पाच्या आज्ञेने गावप्रमुख घाबरला त्याने त्वरित ग्रामसभा बोलाविली आणि सर्व कहाणी गावकऱ्यांना सांगितली. सदूसाठी साक्षात देवाने साक्षात्कार दिला म्हणजे हा सदू कोणी साधासुदा व्यक्ती नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी सदूला त्याच क्षणी झोपेतून उठवत नमस्कार केला. त्याची क्षमा मागून त्याच्या कामाचा न दिलेला मोबदला त्याच्या हाती सोपविला, एव्हढच नव्हे तर सदूलाच त्यांनी गावचा गावप्रमुख बनविला. हे सर्वकाही माझ्या गणेसाच्याच कृपेने झाले आहे असे सदू मानत होता. आणि वारंवार आपल्या आराध्य दैवताचे आभार मानत होता.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: 'हे' पाच गणेश मंत्र दररोज म्हणा; जीवनात काहीच कमी पडणार नाही

सदू इतके दिवस कष्टाचे जिवन जगत होता तर त्याच्यावर बाप्पाचंही लक्ष होतंच हे यावरुन लक्षात येत. म्हणूनच जेथे सदूची सहनशक्ती संपली तेथे देवाने आपल्या किमयेने भक्ताला तारले. त्यामुळे कधीही हार मानू नये. जिथे आपल्याला कमी पडेल तेथे बाप्पा आपली विघ्ने दुर करेल...

म्हणूनच तर बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात.

Web Title: Ganeshotsav 2022 Story Of Mushka Sent Devotees Message To Bappa Ganesha Performed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..