
गणेशोत्सवात घरोघरी गणरायाची स्थापना होते. आणि १० व्या दिवशी अनंत चतुर्दशीला विसरजन केले जाते. काही ठिकाणी दीड किंवा पाच दिवसांचाही गणपती असतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गणेशोत्सावाची धामधूम अधिक असते. पण कधी विचार केला आहे का की, बहुतांश ठिकाणी गणपती १० दिवसांनीच का विसर्जित केला जातो. या मागे एक खास कारण आहे, ज्याचा संबंध महाभारताशी निगडीत आहे.
काय आहे कथा, जाणून घेऊ
असे मानले जाते की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात गणेश चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला. तसेच या दिवसापासूनच महाभारताचे लेखन सुरू झाले होते असा पौरणिक कथांमध्ये उल्लेख आहे. महाभारताचे लेखन सुरू होण्याआधी महर्षी व्यास यांनी गणरायाला हे लिपीबध्द करण्याची विनंती केली होती. गणेशाने सांगितले की, त्यांनी लिहायला सुरूवात केली तर ते थांबणार नाहीत. आणि जिथे ते थांबतील तिथे थांबले मग पुन्हा लिहिणार नाही.
त्यावेळी महर्षी व्यास म्हणाले की, देवा तुम्हाल विद्वानांचे पण विद्वान आहात आणि मी सामान्य ऋषी , जर माझ्याकडू एखादा श्लोक चुकला तर तुम्ही तो कृपया दुरूस्त करून घ्या. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग १० दिवस चालले.
अनंत चतुर्दशीला जेंव्हा महाभारत लेखनाचे काम पूर्ण झाले, तेंव्हा गणरायांचे शारीर जडवत झाले होते. अजिबात न हलल्याने त्यांच्या शरीरावर धूळ, माती जमा झालेली होती. तेंव्हा गणरायांनी सरस्वती नदीत जाऊन स्नान केले होते. म्हणून गणेशाची स्थापना १० दिवस होते व मग विसर्जन केले जाते.
मनावरचा मळ काढण्याचा काळ
गणेशोत्सवाकडे अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर हा १० दिवस संयमाने राहण्याचा, आपल्या मनावर चढलेला मळ काढून स्वच्छ करण्याचा काळ असतो. याकाळात माणसाने आत्मपरिक्षण करून आपले पूर्ण लक्ष गणरायाच्या भक्तीकडे लावावे.