Ganesh Chaturthi 2022: बाप्पाला अजिबात अर्पण करू नका या गोष्टी, नाही तर रूसेल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022: बाप्पाला अजिबात अर्पण करू नका या गोष्टी, नाही तर रूसेल..

बाप्पाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. सगळीकडे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. घराघरातील गणपतींची स्थापना व पूजा करताना पूजेत काय असावं नसावं याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशात जर तुम्ही बाप्पाला चूकीच्या गोष्टी अर्पण केल्या तर ते रागवू शकतात. त्यामुळे त्यांना चुकूनही अशा गोष्टी अर्पण करू नका. यंदा बाप्पाचं असं स्वागत करा की ते तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यासाठी तुम्हाला खालील चूका टाळाव्या लागेल.

गणपतीची आराधना केल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. भाद्रपदमध्ये शुक्ल पक्षात येणारी गणेश चतुर्थी फार खास मानली जाते. कारण या दिवशी गणपतीचा बाप्पाचा जन्म झाला होता. त्यामुळेच पुढल्या दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या थाटामाट आणि दणक्यात साजरा केला जातो. मात्र शास्त्रानुसार गणपती त्यांच्या भक्तांवर जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्या लवकर ते रूसतात सुद्धा.

बाप्पाला चुकून अर्पण करू नका या गोष्टी

बाप्पाला तुलशीची पानं अर्पण केल्या जात नाही. त्यामुळे चुकूनही बाप्पाला तुळशीची पानं अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार बाप्पाने तुळशीच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. ज्यामुळे चिडून तुळशीने गणेशाला दोन लग्नाचा श्राप दिला होता. यानंतर गणेशनेही तुळशीला श्राप दिला होता की, तिचं लग्न राक्षसासोबत होईल मात्र नंतर तू विष्णूची आवडती होशील. या श्रापानंतर तुळशीला तिची चूक लक्षात आली. मात्र गणेशांनी त्यांच्या पूजेत यानंतर तुलशी अर्पण केल्या जाणार नाही असे म्हटले होते. त्यामुळे तुम्ही चुकूनही तुळशी अर्पण करू नका.

केतकीचं फूल

बाप्पाचे वडील भगवान शंकर यांचा केतकीचं फूल पावन मानल्या जातं. याच कारणाने गणपतीला केतकीचं फूल अर्पण केल्या जात नाही.

तुटक्या आणि कोरड्या अक्षता वाहू नका

गणपती पूजेत तुटलेल्या किंवा कोरड्या अक्षता वापरू नका. पूजा करताना अक्षता कोरड्या झाल्या असतील तर त्याला ओल्या करून घ्या.

पांढऱ्या वस्तू चढवू नका

गणपतीला पांढऱ्या वस्तू चढवणं अशुभ मानल्या जातं. कारण पांढऱ्या वस्तू चंद्राशी संबंधित असतात. चंद्रदेवाने एकदा गणेशजीची थट्टा केली होती. त्यामुळे रागात गणपतीने चंद्राला श्राप दिला होता. त्यामुळे बाप्पाला पांढऱ्या रंगाचे फूल, वस्त्र,चंदन या गोष्टी अर्पण केल्या जात नाही.