
गणेश विसर्जन 2025 मध्ये पर्यावरणाची काळजी घेत गणपती बाप्पाचे विसर्जन घरीच करण्याचा सल्ला दिला जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात भक्तीमय वातावरणात गणरायाची पूजा केली जाते.
विसर्जनासाठी मातीच्या गणपतीची मूर्ती घरच्या घरी पाण्यात विसर्जित करून नंतर ते पाणी झाडांना वापरण्याचा सल्ला दिला जातो.
Ganesh Visarjan 2025: देशभरात जल्लोषात साजरा केला जाणारा गणेशोत्सव 27 ऑगस्टला ला सुरू झाला आहे. या काळात गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणरायाला आवडते मोदक, लाडू, दुर्वा आणि लाल फुल अर्पण केले जाते.
ज्या घरांमध्ये किंवा मंदिरांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते तेथील वातावरण भक्तीमय आणि प्रसन्न राहते. मात्र १० दिवसांनंतर अनंत चतुर्थीला गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन केले जाते.
पण अनेक घरांमध्ये दहा दिवसांचा गणपती बसवला जात नाही. काही लोक दीड किंवा पाच दिवसांचा गणपती बसवतात आणि विसर्जन करतात. खरं तर गणपती बाप्पाचे विसर्जन नदी, तलावामध्ये केले जाते. पण पर्यावरणाची काळजी लक्षात घेता घरीच बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करू शकता. तुम्ही घरीच बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करत असाल तर पुढील गोष्टींचे पालन केले पाहिजेत.