%20-%202024-09-04T121518.162.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ganesh Chaturthi Special: देशभरात गणेशोत्सव ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. यंदा ७ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यामुळे लाडक्या बाप्पांच्या आगमनाची आतुरता सर्वांना लागली आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. बाजारपेठाही मुर्ती, सजावटीचे साहित्य,मिठाइ यासारख्या अनेक गोष्टींनी सजली आहे. वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक मूर्ती बाजारात पाहायला मिळत आहेत.
दहा दिवस चालणारा गणपती उत्सव देशभरात जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी काळात प्रत्येक घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आणि मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवा दरम्यान विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास अनेक संकटांमधून सुटका होते.
गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पांची सकाळ- संध्याकाळ पूजा केली जाते. अशावेळी आरतीच्यावेळी गोंधळ होऊ नये म्हणून साहित्य कसे गोळा करावे हे जाणून घेऊया.