Ganesh Visarjan : रात्री 12 नंतर साऊंड सिस्टिम लावण्यावरुन पोलिस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने, कराडात तणाव

Karad Ganesh Visarjan : कराडमधील मुख्य चावडी चौकात मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
Karad Ganesh Visarjan
Karad Ganesh Visarjanesakal
Updated on
Summary

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ते न ऐकल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना चावडी चौकातून कृष्णा नदीपात्राकडे जाण्यास भाग पाडले.

कराड : गणेश मूर्ती विसर्जनासाठी कराडमध्ये (Karad Ganesh Visarjan) मोठा उत्साह होता. रात्री 12 नंतर गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पोलिसांनी (Karad Police) साऊंड सिस्टिम, वाद्य वाजवण्यास बंदी केली. एका गणेश मंडळांने रात्री बारानंतर एक तर गाणी वाजू द्या या मागणीवरून चावडी चौकातच काही काळ ठिय्या मारला होता. त्या दरम्यान कराडचे पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर यांनी संबंधित मंडळास पुढे जाण्यास सांगितले.

मात्र, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ते न ऐकल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना चावडी चौकातून कृष्णा नदीपात्राकडे जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. कराडला सकाळी दहा वाजल्यापासून गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

Karad Ganesh Visarjan
Karad Ganesh Visarjan : गणेशमूर्ती विसर्जनासाठी कराडात मोठा उत्साह; आतापर्यंत 109 गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन

कराडमधील मुख्य चावडी चौकात मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विविध मंडळांकडून झांजपथक, पारंपरिक वाद्य यांना पसंती दिल्याचे दिसून आले. रात्री बारानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, स्पीकर लावण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री बारानंतर आलेल्या गणेश मंडळांना स्पीकर व वाद्य वाजवणे बंद करावे, असे आवाहन केले. कराडमधील चावडी चौकात एका गणेश मंडळाने आम्हाला बारानंतर एक तरी गाणे वाजू द्या, असा हट्ट धरून काही काळ तेथे ठिय्या मारला होता.

Karad Ganesh Visarjan
Mangalore Crime : समाजकंटकांकडून प्रार्थनास्थळावर तुफान दगडफेक, खिडक्यांच्या फोडल्या काचा; सहा जणांना अटक

त्या दरम्यान कराडचे पोलीस उपाधिक्षक ठाकूर यांनी रात्री बारा वाजल्यानंतर एकही गाणं वाजवता येणार नाही पुढे चला, असे आवाहन मंडळाला केले. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांचे न ऐकल्याने पोलिसांनी बळाचा वापर करन त्यांना कृष्णा नदीपात्राकडे जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही काळ चावडी चौकात तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही कालावधीनंतर तो तणाव निवळला आणि पूर्ववत विसर्जन सुरू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The ‘Bhuleshwar Cha Raja’ Ganesh idol fell during the arrival procession in Mumbai’s Bhuleshwar area, killing two people and injuring five others.
Pune Ganeshotsav Sound Restrictions Trigger Fresh Clash Between Mandals and Police
Ganeshotsav 2026 12 days after nine years
solapur city police
Marathi News Esakal
www.esakal.com