Konkan Ganeshotsav : महाराष्ट्रात असं एक गाव आहे, तिथं कुणाच्याही घरी गणपती प्रतिष्ठापना होत नाही; काय आहे कारण?

गावात गणपती आणल्यास गावावर अरिष्ट येते, अशी ‘साले’करांची धारणा आहे.
Konkan Ganeshotsav
Konkan Ganeshotsavesakal
Summary

‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना महाराष्ट्रात काही काळ राबवण्याचा प्रयत्न झाला होता, पण ‘साले’ गावात खूप वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते.

करंजाडे : कोकणातील गणेशोत्सव (Konkan Ganeshotsav) आणि तेथील शक्ती-तुऱ्याचा ‘बाल्या’ डान्स यासाठी चाकरमानी कोठेही असला तरी तो गावाकडे येतोच. त्यासाठी एसटी आणि कोकण रेल्वेला खास व्यवस्था करावी लागते. प्रत्येक घराघरांत गणपती हे कोकणचे वैशिष्ट्य.

Konkan Ganeshotsav
'माळीचे घर' इथं सातशे वर्षे जुना गणेशोत्सव; 80 कुटुंबांच्या सामूहिकतेतून साजरा होतोय सण, जाणून घ्या बाप्पाची महती

मात्र, रायगड जिल्ह्यातील एक गाव असे आहे की, तिथे कुणाच्याही घरी गणपती विराजमान होत नाही, तरीही सगळे चाकरमानी गणपतीच्या दिवशी सहकुटुंब एकत्र जमतात. त्यामुळे संपूर्ण कोकणात हे गाव वैशिष्ट्यपूर्ण ठरते. या गावाचे नाव आहे ‘साले’ (Sale Village Mangaon)!

माणगावपासून चार किमी आणि मुंबई-गोवा महामार्गापासून दीड किमी अंतरावर ‘साले’ गाव वसले आहे. बहुसंख्य कुणबी समूहाची कुटुंबे असलेल्या या गावाला भोनकरांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. कोकण आणि गणपती यांचे नाते घनिष्ट आहे, पण ‘साले’ गावात कुणाच्याही घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही, पण गणेशोत्सवाला चाकरमानी आपल्या गावात येतात.

Konkan Ganeshotsav
Kolhapur Ganeshotsav : पोलिसांसमोरच DJ चा दणदणाट; गणेश मंडळांना पाठवणार नोटिसा, पोलिस अधीक्षक अॅक्शन मोडवर..

गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील लहान थोर सगळे उपवास करतात. गावातील तलावाच्या कातळावर असलेल्या गणेश मंदिरात सगळे गावकरी जमतात. तेथील गणेशमूर्तीची पूजा करतात. त्यानंतर आरती होऊन सर्वांना प्रसाद वाटला जातो. नंतर सजवलेल्या पालखीत देवाला ठेवले जाते.

तरुण पालखी खांद्यावर घेऊन शंखनाद करीत तलावात उतरतात. तलावातील पाण्यातून पालखी ३०० मीटरवरील पलीकडच्या तिरावर आणली जाते. या वेळी तलावात कितीही पाणी असले तरी पाणी फक्त पालखीच्या खुरांना लागते, त्यापेक्षा वर चढत नाही, अशी इथल्या ग्रामस्थांची श्रद्धा आहे. पालखी पलीकडच्या तिरावर आल्यावर गावातील प्रत्येकाच्या घराच्या दारात ती उभी राहते.

Konkan Ganeshotsav
Konkan Ganeshotsav : गणेश विसर्जनात मगरींचं विघ्न; जीव मुठीत धरून करावं लागतंय बाप्पाचं विसर्जन, नदीत फोडले जाताहेत बॉम्ब!

भक्तांचे श्रद्धास्थान

गावात गणपती आणल्यास गावावर अरिष्ट येते, अशी ‘साले’करांची धारणा आहे. त्यामुळे या गावाच्या हद्दीत कुणीही गणपती आणत नाही. मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात या गावात भक्त जातात. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना महाराष्ट्रात काही काळ राबवण्याचा प्रयत्न झाला होता, पण ‘साले’ गावात खूप वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com