esakal | बाप्पाच्या प्रसादाचे पेढे उरलेत? बनवा सोप्पा अन् टेस्टी पदार्थ
sakal

बोलून बातमी शोधा

khir

बाप्पाच्या प्रसादाचे पेढे उरलेत? बनवा सोप्पा व टेस्टी पदार्थ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

विघ्नहर्ता गणपती बाप्पा १० दिवसांसाठी आपल्या भक्तांच्या घरी विराजमान होतो. आणि त्या दिवसात बाप्पाला विविध प्रसाद -नैवेद्याच्या तयारीची लगबग सुरू होते. आरती चालू असताना अनेकदा प्रसादाचं ताटावरच अनेकांच्या नजरा खिळलेल्या... बरेचदा प्रसाद साधाच असतो पण त्यातही आकर्षण वाटायचं. प्रसाद म्हणून अनेकदा पेढे, साखरफुटाणे, देवासमोर फळांचे तुकडे असे ठेवले जाते. पण पहिल्या दिवशी मोठ्या हौसेने मिठाई, लाडू, पेढे असे दुग्धजन्य प्रसाद ठेवले जातात. जे काही दिवसांतच संपवावे लागतात. मग अधिक प्रमाणात जर हे पदार्थ हे उरले.. तर त्याचं करायचं काय? असा प्रश्न अनेक गृहिणींना निर्माण होतो. पण चिंता करू नका.आम्ही या साठी एक अशी रेसिपी सांगत आहोत. जी दिसायला छान, चवीला टेस्टी आणि हे पदार्थही चटकन संपतील अशी आहे. वाचा सविस्तर...

शेवयांची खीर

शेवयांची खीर देखील तुम्ही उरलेल्या पेढ्यांपासून बनवू शकता. कसे ते वाचा पुढे...

साहित्य :

पेढे – ६ ते ७,

साजुक तूप – १ चमचा

शेवया – १/२ वाटी

दुध – ४ वाट्या

सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते)

१ चमचा(बारीक केलेले)बेदाणे

४ ते ५केशर

७ ते ८ काड्यासाखर

३ चमचेवेलची पूड – १ चिमुट

हेही वाचा: गौरीच्या मांडवात ठेवण्यासाठी असे बनवा झटपट चिरोटे

कृती:

१. पेढे मोडून १ वाटी कोमट दुधात घालावेत. मिश्रण छान ढवळा आणि सर्व पेढे दुधात विरघळू द्या. एका वाटी मध्ये १ चमचा कोमट दुधात केशर घालून ढवळावे, असं केल्याने केशराचा रंग व गंध खुलून येतो.

२. कढई मध्ये १/२ चमचा साजूक तूप घालून गरम करावे. प्रथम काजू, बदाम, पिस्ते, मनुका असा सुका मेवा २ ते ३ सेकंद परतून घ्यावा. मग त्यातच शेवया आणि उरलेलं तूप घालुन मध्यम आचेवर छान परतून घ्यावं. एकसारखा रंग येण्यासाठी सतत परतत राहावे. शेवया गडद रंगाच्या होईपर्यंत छान परताव्या.

३. परतलेल्या शेवयांमध्ये २ वाट्या दुध घालावे. दुध थंड, कोमट, गरम कसेही असले तरी चालते. खीर घट्ट हवी असल्यास दुध जरा कमी घालावे. आता पेढे मिश्रित दुध देखील शेवयांमध्ये घालावे. सर्व जिन्नस नीट ढवळून घ्यावेत.

हेही वाचा: बाप्पाच्या नैवद्यासाठी बनवा कर्नाटकातील 'हे' खास पदार्थ

४. सर्व मिश्रण कमी आचेवर शिजू द्यावं.मिश्रण सतत ढवळत रहावे म्हणजे दुध किंवा शेवया कढईला चिकटत नाही. दुधाला एक उकळी येऊ द्यावी.

५. दुधाला उकळी येताच त्यात साखर व केशर-दुधाचे मिश्रण घालावे. साखर विरघळे पर्यंत मिश्रण छान ढवळून घ्यावे.

६. त्या नंतर वेलची ची पूड घालावी व पुढील ३ ते ४ मिनिटे खीर शिजू द्यावी. शेवया शिजल्या का पहाव्या (म्हणजेच शेवया काहीश्या फुगतात व मऊ होतात). खीर तयार झाली की छान आळते व थोडी घट्ट होते. कढईत कडेने जमलेला सायीचा थर चमच्याच्या सहाय्याने काढून खिरीमध्ये घालावा, खीर दाट व्हायला मदत होते.

७. खीर शेगडीवरून उतरवावी. पुन्हा एकदा ढवळून घ्यावी. चव पहावी साखर कमी वाटल्यास चवीप्रमाणे आणखी घालावी. जास्त साखर वाटल्यास उरलेलं थोड दुध घालावं.

८. खीर गरम, कोमट किंवा थंड आवडी प्रमाणे सर्व्ह करावी (संदर्भासाठी सोबतचा फोटो पहा). एक लक्षात घ्या, खीर थंड झाली की आळते व थोडी घट्ट होते अश्या वेळेस उरलेलं दुध खिरीमध्ये घालून हवी तेवढी पातळ करून घ्यावी.

टीप- पेढ्यांमध्ये बऱ्यापैकी साखर असते, त्यामुळे वरील प्रमाणात साखर कमी सांगितली आहे. आवडी प्रमाणे साखरेचे प्रमाण निश्चित करावे.

go to top