esakal | सेल्फी विथ गणेश विसर्जन! घरगुती गणेशमूर्ती वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

सेल्फी विथ गणेश विसर्जन! घरगुती गणेशमूर्ती वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धा

घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सेल्फी विसर्जन वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिली.

सेल्फी विथ गणेश विसर्जन! घरगुती गणेशमूर्ती स्पर्धा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका (Solapur Municipal Corporation) वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अंतर्गत शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सेल्फी विसर्जन (selfie with ganesh) वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) काळात गणेश मूर्ती विसर्जन यादरम्यान नागरिकांची गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे अत्यंत आवश्‍यक आहे. तसेच कोविड-19 मुळे संसर्गजन्य उद्‌वलेल्या परिस्थितीचा विचार करता गणेशमूर्ती विसर्जन घरगुती साध्या पद्धतीने माजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हेही वाचा: गौरी-गणपतीकरिता अनारकली, चंद्रकला मोदकांची मोठी रेंज!

राज्यस्तरीय तसेच स्थानिक वृत्तपत्रे यांच्या मार्फत नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक तसेच घरगुती पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन करण्याकरिता जनजागृती होण्याकामी सोलापूर महानगरपालिकेकडून घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाचे सेल्फी विसर्जनाची वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये नागरिकांनी आपल्या घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना गणेशमूर्ती समवेत सेल्फी घ्यावयाचा असून, ते फोटो राज्यस्तरीय तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी आपल्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करावयाचे आहेत. वृत्तपत्रामधून या स्पर्धेचे कमीतकमी फोटो प्रकाशित केल्यास 50 टक्‍के गुणांकन देण्यात येणार असून, वृत्तपत्राचे संपूर्ण पान जास्तीत जास्त फोटोंसह प्रकाशित केल्यास 100 टक्‍के गुणांकन देऊन प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे.

हेही वाचा: पंढरपूरकरांचा यंदा प्रबोधनाचा गणेशोत्सव !

स्पर्धेतील बक्षिसे खालीलप्रमाणे...

  • राज्यस्तरीय वृत्तपत्रासाठी पहिले बक्षीस - 4 लाख, दुसरे बक्षीस 3 लाख, तिसरे बक्षीस - 2 लाख रुपये.

  • स्थानिक वृत्तपत्रांसाठी पहिले बक्षीस 3 लाख, दुसरे बक्षीस 2 लाख, तिसरे बक्षीस 1 लाख रुपये.

loading image
go to top