गुरूजी तालीम गणपतीचे आगमन रंगेबेरंगी फुलांच्या रथातून 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

गुरूजी तालीम गणपतीच्या मिरवणूकीत यावर्षी प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांचे पथक सहभागी झाले.

पुणे : गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या असलेल्या गणपतीची मिरवणूक कार्यकर्त्यांनी रंगेबेरंगी फुलांच्या रथातून काढली. या मिरवणूकीत नादब्रम्ह, गर्जना, समर्थ प्रतिष्ठान, गुरुजी प्रतिष्ठान या पथकांसह यावर्षी प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांचे पथक मिरवणुकीत सहभागी झाले.

उद्योगपती विशाल व श्‍वेता चोरडिया यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: procession of Guruji Talim Ganpati in Ganesh Festival 2019