Video : 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत पुण्यातील बाप्पांना निरोप!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

दगडुशेठचा गणपती यंदा विकटविनायक रथात विराजमान होता, तर कसबा व तांबडी जोगेश्वरी, केसरी वाडा गणपतीची पारंपारिक पालखीत मिरवणूक काढण्यात आली. गुरूजी तालीम व तुळशीबागचा गणपती आकर्षक फुलांच्या रथात विराजमान करण्यात आले होते.

पुणे : पुण्यातील सर्व महत्त्वाच्या गणपतींचे वाजतगाजत विसर्जन झाले असून इतर मंडळांच्या विसर्जन मिरवणूकी सुरू आहेत. पुण्याचे आराध्य दैवत दगडुशेठ हलवाई गणपतीचे सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी विसर्जन झाले, तर अखिल मंडई मंडळाचा गणपती सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी विसर्जन झाला. 

Video : दगडुशेठ हलवाई गणपतीचा भक्तांना निरोप; पुढच्या वर्षी लवकर या!

भाऊ रंगारी मंडळाचा गणपती सकाळी साडेसहाच्या दरम्यान विसर्जन झाला. पुण्याच्या मानाच्या सर्व गणपतींचे सहावाजेपर्यंत विसर्जन झाले होते. ढोेल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. 

दगडुशेठचा गणपती यंदा विकटविनायक रथात विराजमान होता, तर कसबा व तांबडी जोगेश्वरी, केसरी वाडा गणपतीची पारंपारिक पालखीत मिरवणूक काढण्यात आली. गुरूजी तालीम व तुळशीबागचा गणपती आकर्षक फुलांच्या रथात विराजमान करण्यात आले होते.

बाबू गेनू मंडळ व जिलब्या मारूती मंडळांनीही आकर्षक आणि भव्य असे रथ बाप्पाच्या विसर्जनासाठी तयार केले होते. 

लक्ष्मी रस्त्यावरील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्ससमोर भाऊ रंगारी गणपतीच्या रथाचा बैल बिथरला. उधळलेल्या बैलावर वेळीच नियंत्रण आणल्याने पुढील अनर्थ टळला. रथ नागरिकांच्या अंगावर जाता जाता राहिला. 

भाऊ रंगारी गणपतीचा रथ उधळला... पण अनर्थ टळला!

यावर्षी दगडुशेठ गणपतीचे मनमोहक रूप विकटविनायक रथात विराजमान होते. असंख्य रंगांनी या रथाला विद्युतरोषणाई करण्यात आली होती. दगडुशेठ मंडळाच्या रथाचे सारथ्य पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune ganpati visarjan rally