मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. ही गर्दी सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वे गणपती विशेष गाड्यांना विनाआरक्षित तीन द्वितीय श्रेणीचे डबे जोडणार आहे. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 232, तर पश्चिम रेल्वेने 50 विशेष गाड्या कोकणसाठी सोडल्या आहेत.

ता. 11 आणि 18 सप्टेंबरला सुटणारी गाडी क्रमांक 01095 लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड गाडी, 12 आणि 19 सप्टेंबरला 01096 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस, 13 आणि 15 सप्टेंबरला गाडी क्रमांक 01103 लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड या विशेष गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी 14 आणि 16 सप्टेंबरला सुटणाऱ्या गाडी क्रमांक 01104 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीला जादा डबे जोडण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या चारऐवजी सात विनाआरक्षित द्वितीय श्रेणीच्या डब्यांसह चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.