#BappaMorya सीडीजच्या मागणीमध्ये घट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

पुणे - गणेशोत्सवात गाण्यांच्या तालावर अन्‌ प्रसन्न वातावरणात बाप्पाचे स्वागत होणार आहे. यासाठी बाप्पाच्या आरतीच्या सीडीज्‌सह विविध गाण्यांवर ठेका धरायला लावणाऱ्या सीडीज बाजारात आल्या आहेत. नव्या-जुन्या चित्रपटांतील गीतांबरोबर रिमिक्‍स गाण्यांनीही पसंती मिळत आहे. मात्र, सोशल नेटवर्किंग साइट्‌स, यू-ट्यूब आणि विविध म्युझिक ॲपमुळे सीडीज्‌ची मागणी कमी झाली आहे. इंटरनेटवरून एखादे गाणे सहज डाउनलोड करता येत असल्यामुळे सीडीजची मागणी ७० टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे व्यावसायिक सांगतात.

नव्या-जुन्या चित्रपटातील गाणी, नवीन रिमिक्‍स गाणी, रॅप साँग्ज, डीजे साँग्जसह बाप्पाची संपूर्ण आरती, भक्तिगीते, गणेशमंत्र, आरती संग्रह, अथर्वशीर्ष, गणेश व इतर देवतांचे स्रोत असलेल्या सीडीज्‌ बाजारात आल्या आहेत. याबाबत जयंतीभाई सोळंकी म्हणाले, ‘‘मागच्या वर्षापासून सीडीज्‌ची मागणी कमी झाली असून, यंदा तर ७० टक्के लोकांनी सीडीजकडे पाठ फिरवली आहे. सीडीज्‌सह बाजारात बाप्पाची आरती असणारे पेनड्राइव्हही उपलब्ध आहेत.’

स्वतःचेच यू-ट्यूब चॅनेल्स...
इंटरनेटमुळे सीडीज्‌ची मागणी कमी झाल्याने व्यावसायिकांच्या नव्या पिढीने मार्केटिंगची अभिनव शक्कल लढविली आहे. काहींनी लोकांना आकर्षित करण्यासाठी स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरू केले आहेत. त्यालाही लोकांची पसंती मिळत आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #BappaMorya Ganeshotsav 2018 CD demand reduce