दगडूशेठ हलवाईतर्फे 50 कोटींचा विमा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पुणे : गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने 50 कोटी रुपयांचा विमा उतरविला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सव प्रमुख नगरसेवक हेमंत रासने आणि महेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्याशिवाय गणपती मंदिराच्या एक किलोमीटरच्या परिसराचा वर्षभरासाठीचा पाच कोटी रुपयांचा विमा उतरविला आहे. 

गणेशोत्सवात एखादी दुर्घटना घडल्यास पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि लष्कराच्या हद्दीतील नागरिकांना यातून विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. या काळात एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास पाच लाख रुपये, अंशतः अपंगत्व आल्यास दोन लाख, तर जखमी झालेल्या व्यक्तीस 50 हजारांपर्यंत औषधोपचाराचा खर्च मिळणार आहे.

तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहेत. पोलिस यंत्रणेसह ट्रस्टचे 150 महिला व खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dagdusheth Halwai Ganpati opts for insurance