Ganesh festival : कोल्हापूर पाच लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - सजग आणि सुज्ञ कोल्हापूरकरांनी यंदाही जिल्ह्यात पाच लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय, सुमारे बाराशे ते दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. 

कोल्हापूर - सजग आणि सुज्ञ कोल्हापूरकरांनी यंदाही जिल्ह्यात पाच लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय, सुमारे बाराशे ते दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही मूर्तींच्या संख्येत वाढ झाली असून, पर्यावरणपूरक विसर्जन हा उपक्रम लोकचळवळ बनत असल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापूर महापालिका क्षेत्रात रात्री साडेदहापर्यंत ४७ हजारांवर आणि शंभरहून अधिक ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. त्याशिवाय, शहरातील उपनगरे आणि गावांतून येणारा ओघ कायम होता. इराणी खण परिसरात ट्रॅक्‍टरची रांगच लागली होती. जिल्ह्यातील एक हजार ३० गावांत रात्री आठपर्यंत दोन लाख ७३ हजारांवर मूर्ती संकलित झाल्या. त्यानंतरही मूर्ती संकलन सुरू होते. पालिका क्षेत्रातील आकडेवारी उपलब्ध झाली नाही. मात्र, येथे किमान सव्वा लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाल्याचा अंदाज आहे.  

ग्रामपंचायत, पालिका, महापालिका आणि जिल्हा प्रशासन अशा सर्वच पातळ्यांवरून पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्यासह पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी उदय गायकवाड, दिलीप देसाई, अविनाश कडली, अनिल चौगुले, संजय मोरे यांनी आज दिवसभर पिरळ (ता. राधानगरी) ते नृसिंहवाडी या पंचगंगा नदीपात्राच्या गावांचा दौरा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eco-friendly immersion of Ganesh statues of five lakhs