कागद्याच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना; पाहा व्हिडिओ

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 4 September 2019

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार केलेल्या गणेश मूर्ती पासून निसर्गाची होणारी हानी टाळण्यासाठी अनुष्का कजबजे यांनी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना त्यांनी केली आहे. 
 

पुणे : पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्याच्या कल्पनेला अनेकजण सध्या प्राधान्य देत आहेत. भारती विद्यापीठातील पर्यावरण विषयाच्या प्राध्यापिका अनुष्का कजबजे यांनी त्यांच्या घरी  कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या पर्यावरणपूक गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. जी पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.

याविषयी बोलताना त्या म्हणाल्या,"गणेशोत्सवात पर्यावरणाची मोठी हानी होत असते ती कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक गणपती बसविला आहे. गणेश मूर्ती आणि सजावट दोन्ही पर्यावरणपूरक असून गणरायाचे विसर्जन बादलीत करणार आहोत. सर्वांनी जर पर्यावरणपूरक गणपती बसविण्यास प्राधान्य दिले तर पर्यावरणाची हानी कमी होईल.'' 

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार केलेल्या गणेश मूर्ती पासून निसर्गाची होणारी हानी टाळण्यासाठी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना त्यांनी केली आहे. कजबजे या पर्यावरणाच्या प्राध्यापिका असल्याने गणेशोत्सवात होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी त्यांनी गणपतीची मूर्ती व सजावट आणि रांगोळी पर्यवाणपूरक केली आहे. याशिवाय ऑनलाइन मागविलेल्या गणेश मूर्तीची रंगरंगोटी देखील पर्यावरणपूरक रंगानेच करण्यात आली असून सजावटीसाठी घरातील झाडांचा वापर करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ecofriendly ganesh murti by paper waste