जुन्नरला महाविद्यालयाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून मारामारी

दत्ता म्हसकर
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

जुन्नर - गणपती मिरवणूक सुरू असताना, 'तू नीट नाच, नाहीतर तुझ्याकडे बघतो' असे म्हणून मारहाण व दमदाटी केल्या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी चौघांजणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

जुन्नर - गणपती मिरवणूक सुरू असताना, 'तू नीट नाच, नाहीतर तुझ्याकडे बघतो' असे म्हणून मारहाण व दमदाटी केल्या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी चौघांजणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांच्या माहिती नुसार शनिवारी ता.15 रोजी दुपारी येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना नाचण्याच्या कारणावरून अनिकेत विक्रम भालेकर, वय २०, रा.आलमे, ता.जुन्नर याची कॉलर पकडून शक्ती चंद्रकांत गायकवाड हा दमदाटी करू लागला असता यावेळी बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांना समजावून सांगून घरी जाण्यास सांगितले. यानंतर अनिकेत घरी जात असताना शक्ती व त्याचे मित्र निखिल भगत, निलेश बुळे,ओम भगत (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा.खानापूर, ता. जुन्नर, जि. पुणे, यांनी त्याला अडवून दगड, लाकडी काठी, हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी शक्ती चंद्रकांत गायकवाड, निखिल भगत, निलेश बुळे, ओम भगत सर्व रा. खानापूर, ता. जुन्नर, जि. पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . 

विसर्जन मिरवणुकीत ताफा पथके सहभागी झाली होती. यामुळे मिरवणुकीत नाचण्यासाठी महाविद्यालयात असणारी व नसणारी तरुण मुले देखील सहभागी झाली होती. अनिकेत हा महाविद्यालयात शिकत नसल्याचे सांगण्यात आले. 

जुन्नरच्या महाविद्यालय परिसरात जुन्नर व जवळपासचे महाविद्यालयात शिक्षण न घेणारे अनेक तरुण वावरत असतात. याबाबत महाविद्यालय व पोलिस प्रशासन यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने किरकोळ मारामाऱ्या ,टिंगल-टवाळकीचे प्रमाण वाढत चालले आहे याचा बंदोबस्त व्हावा अशी पालकांची मागणी आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight in Ganesh Visrjan miravnuk in junnar