
पारगाव, अवसरी बुद्रुक, धामणी, पारगाव, लोणीस लाखणगाव, काठापुर बुद्रुक, देवगाव व खडकवाडी आदी गावात घरगुती गणेशाचे सकाळीच प्रतिस्थापना करण्यात आली. तर सार्वजनिक मंडाळांनी ढोल ताशांच्या गजरात गणेशमुर्तींची मिरवणुक काढून गणेशमुर्तीची प्रतिस्थापना केली.
पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात आज उत्साहात गणेशोत्सवाला सुरवात झाली. सार्वजनिक मंडाळांनी पारंपरिक वाद्याच्या आवाजात ढोल ताशांच्या गजरात गणेशमुर्तींची मिरवणुक काढून भक्तीभावाने गणेशमुर्तीची प्रतिस्थापना केली.
पारगाव, अवसरी बुद्रुक, धामणी, पारगाव, लोणीस लाखणगाव, काठापुर बुद्रुक, देवगाव व खडकवाडी आदी गावात घरगुती गणेशाचे सकाळीच प्रतिस्थापना करण्यात आली. तर सार्वजनिक मंडाळांनी ढोल ताशांच्या गजरात गणेशमुर्तींची मिरवणुक काढून गणेशमुर्तीची प्रतिस्थापना केली.
दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडाळाच्या गणेश मुर्तीची प्रतिस्थापना विधानसभेचे माजी अध्यक्ष व भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलिप वळसे पाटील व त्यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांच्या हस्ते आरती करुन करण्यात आली.
यावेळी श्री. वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालक देवदत्त निकम, संचालक ज्ञानेश्वर गावडे, माऊली आस्वारे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, मंदाकीनी हांडे, कल्पना गाढवे,कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, सांस्कृतिक मंडाळाचे सचिव कैलास गाढवे व सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
आजपासून येथील गणेशोत्सव 2018 ला सुरवात झाली. शुक्रवार (दि. 14) ते सोमवार (दि. 17) पर्यंत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 41 हजार रुपये, व्दितीय क्रमांकास 31 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 21 हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकास 15 हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. सोमवारी रात्री 8 ते 11 'धमाल दे कमाल मराठी' लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि.18 सकाळी 11 वाजता सत्यनारायणाची महापुजा व दुपारी महाप्रसाद, दुपारी 3 ते 5 पर्यंत महिलांसाठी होम मिनीस्टर कार्यक्रम रात्री 8 ते 11 पर्यंत चोरी चोरी चुपके चुपके मराठी विनोदी नाटक, बुधवार (दि. 19) सकाळी 11.30 ते 12.30 बालव्याख्याते साहील बरकले यांचे व्याख्यान दुपारी एक वाजता महाआरती त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार आहे.