
गणपती घरी आले की घरात खाण्यापिण्याची चंगळ ऐरवीपेक्षा जरा जास्तच असते, नाही का! गणपती बाप्पांसाठी दहा दिवस नवनवीन प्रसाद कोणता बनवावा याची लिस्ट तर काहीजण आधीच बनवून ठेवतात. पण तुमच्या या लिस्टमध्ये 'हा' प्रसादाचा पदार्थ आहे का? अहो नसेल तर लगेच शामिल करा. गणपती बाप्पाला खुश करायचं आहे ना.. मग या पदार्थांची रेसिपीखास गणेशोत्सव निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
चॉकलेट शिरा मोदक -
मंद आचेवर पॅन ठेवा. पॅनमध्ये अर्धा चमचा तुप टाका. तुप किंचीत गरम झालं की तीन टेबल स्पून शिऱ्याचा रवा त्यात घालावा. त्यात कोको पावडर मिस्क्स करा. त्यात एक कप गरम पाणी घाला. हे मिश्रण नीट मिक्स करुन मध्यम आचेवर 5 मिनीट झाकुन ठेवा. गॅस कमी आचेवर सुरुच ठेवा. नंतर हे मिश्रण ढवळून ड्राय करुन घ्या. त्यात एक टेबल स्पून साखर, काजू, बदामचे बारिक काप, 2 कप मिल्क चॉकलेट घाला. चॉकलेट विरघळेपर्यंत मिक्स् करा. मिश्रण दाट होईपर्यंत ढवळत रहा. मिश्रण दाट झाले की गार करुन घ्या. गार झाल्यानंतर मोदकाच्या साचात मिश्रण भरा आणि ताटात मोदक काढा. चॉकलेट शिरा मोदक तयार.