गोड बुंदी : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!

ganapati special god bundi
ganapati special god bundi

गोड बुंदी -
अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी कमी आचेवर ढवळत रहा. 3 मिनीट (साखर विरघळेपर्यंत) हे मिश्रण शिजवा. हा आपला पाक तयार झाला. पाकाची तार तुटणार नाही याची काळजी घ्या. या पाकात आवडीनुसार वेलची पूड, केशर रंग टाकू शकता. हा पाक बाजूला ठेवा. आता बाउलमध्ये अर्धा कप बेसन, थोडं थोडं पाणी टाकत एक मिश्रण तयार करा. मिश्रण जास्त पातळ किंवा जाडसर राहायला नको. (या मिश्रणाचे सर्वसाधारण प्रमाण - 1 कप बेसन आणि 3/4 कप पाणी) मोहनासाठी 2 लहान चमचे तेल त्यात टाका आणि मिक्स् करा. आता एका कढईत तेल गरम करुन घ्या. तेल अति गरम करु नका. बुंदीच्या झाऱ्यातून बेसनचे मिश्रण कढईत सोडा. जरा बुंदीचा रंग जास्त गडद न येताच ती बाहेर काढा. (बुंदी लाल होईपर्यंत तळू नका). आधी तयार केलेल्या साखरेच्या पाकात तळलेली बुंदी टाका, मिक्स करा आणि छाकून ठेवा. तासाभराने पुन्हा एकदा बुंदी मिक्स करा आणि छाकून ठेवा. 7 ते 8 तास तसंच राहू द्या. जेणेकरून पाक बुंदीत पुर्णपणे मुरलेला असेल. (ही रेसिपी रात्री करुन दुसऱ्या दिवशी सकाळी बुंदी तयार असेल.) गोड बुंदी तयार.
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com