
गणपती घरी आले की घरात खाण्यापिण्याची चंगळ ऐरवीपेक्षा जरा जास्तच असते, नाही का! गणपती बाप्पांसाठी दहा दिवस नवनवीन प्रसाद कोणता बनवावा याची लिस्ट तर काहीजण आधीच बनवून ठेवतात. पण तुमच्या या लिस्टमध्ये 'हा' प्रसादाचा पदार्थ आहे का? अहो नसेल तर लगेच शामिल करा. गणपती बाप्पाला खुश करायचं आहे ना.. मग या पदार्थांची रेसिपीखास गणेशोत्सव निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
सेवन वडी -
कढईत एक वाटी तूपात एक वाटी बेसन, एक वाटी खोबरा कीस, एक वाटी दूध, तीन वाट्या साखर हे साहित्य मिक्स करुन घ्या. हे मिश्रण ढवळत राहा. त्यात वेलची पूड, ड्रायफ्रुट्स घाला. मिश्रणाचा घट्ट होईपर्यंत मिश्रण ढवळत राहा. घट्ट झाले की ताटाला तूप लावून हे मिश्रण त्यावर ओता. मिश्रण गरम आणि पातळ असल्याने ते आपोआप ताटात पसरेल. साध्या वडीसाठी जसे मिश्रण थापतो तसे हे मिश्रण थापू नका. 3-4 मिनीटांनी मिश्रणाच्या वड्या पाडा. सेवन वडी तयार.
उकडीचे मोदक
चॉकलेट शिरा मोदक : गणपती बाप्पांसाठी खाऊंची...
केळीचे मोदक : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!