मिरजेत बाप्पांचे जंगी स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

मिरज - शहरात सर्वत्र आज गणरायाचे उत्साह आणि आनंदात स्वागत झाले. झांज पथक, बेंजो, ब्रास बॅंडसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरजकर नागरिकांनी घरगुती, सार्वजनिक गणेशाची स्थापना केली. दुष्काळाचे सावट, महागाईचा थोडाफार परिणाम स्वीकारत आज भक्तांनी उत्साहात स्वागत केले.

आज सकाळपासून शहरभर गडबड सुरू झाली. गुरुवारी आणलेल्या घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मुहूर्तावर करण्यासाठी ब्रह्मवृंद धावपळ करीत होता. लक्ष्मी मार्केट ते नागोबा कट्टा हा रस्ता उत्सवाच्या बाजारामुळे फुलला होता. वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. खरेदीसाठी सकाळपासूनच दुकाने व मूर्तिकांराकडे गर्दी होती. बाहेरील गावाहून आलेल्या मूर्तींचे स्टॉल्स शहराबाहेरील उपनगरांत लागल्याने उपनगरांत नागरिकांनी याच मूर्तींना पसंती दिली. घरगुती गणेशाच्या आगमनाची गडबड सुरू असतानाच तरुणाई सार्वजनिक मंडळांच्या गडबडीत दिसत होती. शहर पोलिस ठाण्याकडे २८० तर महात्मा गांधी पोलिस ठाण्याकडे ८० हून अधिक मंडळांच्या नोंदी आहेत. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळाच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या.

पोलिसांचे नियोजन 
गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी जय्यत तयारी केल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. शहरात तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह संवेदनशील ठिकाणी गुप्त वेशातील पोलिस, सोशल मीडिया, पोलिसांच्या रेकॉर्डवरील समाजकटंकांची हद्दपारी, शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर तपासणी नाके उभारले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 miraj ganesh ustav