यंदा उत्सवावर दुष्काळ, मंदीचे सावट

संजय गणेशकर 
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पलूस - पलूस तालुक्‍यात यंदा गणेशोत्सवावर दुष्काळासह मंदीचे सावट आहे. मात्र मंडळांनी ताकदीप्रमाणे तयारी सुरू ठेवली आहे. मूर्तीच्या किंमतीत यंदा वाढ झाली आहे. 

तालुक्‍यात उत्सवाची तयारी गतीने सुरू आहे. मूर्तीवर रंगकाम उरकत आहेत. बहुतांश ठिकाणी मूर्तीचे स्टॉल सजले आहेत. गावागावांत स्वागत कमानी, मंडप, स्टेज, रोषणाई, स्वच्छतेत मंडळांचे कार्यकर्ते व्यस्त आहेत. पारंपरिक कुंभार व्यावसायिकांकडून गणोबा वाटपाचेही काम सुरू आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी मूर्तीची आगाऊ नोंदणी केली आहे.

इकोफ्रेंडली मूर्तीना मागणी आहे. औदुंबर येथील गोपालनंदन गोशाळेत खास गुजरातहून महिला बचत गटांनी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या मूर्ती उपलब्ध केल्या आहेत. त्यांची अगोदर नोंदणी झाल्याने मोठ्या प्रमाणावर विक्रीही झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 plus ganesh ustav

टॅग्स