esakal | बोरीपार्धीत : एक मंडळ एक वृक्ष; पहिला प्रयोग यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

चौफुला ( ता.दौंड ) ः 'एक मंडळ एक वृक्ष' या संकल्पनेची  माहिती देताना डॅा. श्रीवल्लभ अवचट.  

'एक मित्र एक वृक्ष'ने केला. झाडांच्या पुढील संगोपनाची जबाबदारी एक मित्र एक वृक्षने घेतली आहे.

बोरीपार्धीत : एक मंडळ एक वृक्ष; पहिला प्रयोग यशस्वी

sakal_logo
By
रमेश वत्रे

केडगाव : एक मंडळ एक वृक्ष या संकल्पनेतून बोरीपार्धी ( ता.दौंड )  येथे आज विविध प्रकारची 21 झाडे लावण्यात आली. केडगाव परिसर गणोशोत्सवातील हा पहिला प्रयोग यशस्वी झाला.  केडगावात मंगलबाई मुथा यांच्या स्मरणार्थ 'एक मित्र एक झाड' ही संकल्पना गेल्या वर्षापासून राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून या संकल्पनेला 'एक मंडळ एक वृक्ष' ची जोड देण्याचा प्रस्ताव प्रशांत मुथा या युवकाने मंडळांपुढे मांडला. 22 मंडळांनी यात सहभाग घेतला. चौफुल्यातील श्री बोरमलनाथ मित्र मंडळापासून या उपक्रमाला सुरवात झाली. 

वरवंड, बोरीपार्धी, केडगाव येथील आनंद युवा मंच, शिव छत्रपती ग्रुप, गणेश फौंडेशन, विघ्नहर्ता प्रतिष्ठान, दत्त सेवा मंडळ, एकता ग्रुप, शिवतेज युवा प्रतिष्ठान, 'नवशक्ती', 'इंदिरा', 'अभिमान', 'हिंदवी स्वराज्य', 'न्यू डायमंड महिला', 'जय भवानी', 'सावतामाळी', 'शिव छत्रपती', 'अष्टविनायक' आदी मंडळांनी या उप्रमात भाग घेतला. प्रत्येक मंडळापुढे वृक्षारोपन करणे त्याची निगा राखणे अवघड असल्याने 21 मंडळांनी रविवारी ग्रामदैवत बोरमलनाथ मंदिर रस्त्यालगत 21 झाडे लावली. प्रत्येक मंडळाने एक झाड आणले होते. खड्डे व ट्री गार्डचा खर्च 

'एक मित्र एक वृक्ष'ने केला. झाडांच्या पुढील संगोपनाची जबाबदारी एक मित्र एक वृक्षने घेतली आहे. वड,पिंपळ, कडूलिंब, ताम्हण, बहावा, बकुळ, खैर, रिठा, आवळा, अर्जून अशी दुर्मिळ झाडे लावण्यात आली. डॅा. श्रीवल्लभ अवचट यांनी झाडांचे धार्मिक व आयुर्वेदिक महत्व सांगितले. बोरमलनाथ देवस्थानकडून झाडांना ठिबक सिंचन करण्यात येणार आहे. प्रशांत मुथा म्हणाले, झाडे कमी लावा परंतु त्यांचे संगोपन झाले पाहिजे. हा उपक्रम जिल्ह्यातील अन्य मंडळांनी व स्वयंसेवी संस्थांनी राबवावा. दादा गावडे, संकेत पितळे, सचिन मुथा, महादेव पंडीत, लहू धायुगडे, आनंद बोरा, सुरेश शेलार, कैलास गुरव, डॅा. श्रीवल्लभ अवचट व प्रशांत मुथा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.