दीड दिवसाच्या गणरायाला निरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सांगली - ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ मंगल मूर्ती मोरयाऽऽ’च्या गजरात आज दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. ‘पुढच्या वर्षी लवकर या’, अशी साद घालत भक्तांनी कृष्णा नदीत गणेश मूर्ती विसर्जित केल्या. 

सांगली - ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ मंगल मूर्ती मोरयाऽऽ’च्या गजरात आज दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. ‘पुढच्या वर्षी लवकर या’, अशी साद घालत भक्तांनी कृष्णा नदीत गणेश मूर्ती विसर्जित केल्या. 

आपल्या लाडक्‍या बाप्पाच्या स्वागतासाठी गेल्या आठवड्याभरापासून तयारी केली जात होती. त्यासाठी बाजारपेठाही सजल्या होत्या. यंदा प्रत्येकजण पर्यावरणपूरक सजावटीवर भर देत असल्याने, त्यात धर्तीवर सजावटीचे साहित्य खरेदी केले जात आहे. काल शुक्रवारी (ता.२५) भक्तिभावाने गणराचे स्वागत  करण्यात करण्यात आले. मोठ्या भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. प्रथप्रमाणे आज काहींनी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. विसर्जनासाठी सरकारी घाटावर गर्दी झाली होती. सायंकाळी पाचनंतर विसर्जनासाठी गर्दी वाढली. कृष्णाकाठ गणपती बाप्पाच्या जयघोषांनी न्हाऊन  निघाला. आबलावृद्धांसह साऱ्यांचा उत्साह दिसून येत होता. कपाळावर टिळा, डोक्‍यावर टोपी अन्‌ गणरायाचा जयघोष करत निरोप देण्यात आला.  

दरम्यान, महापालिकेतर्फे विसर्जनस्थळी निर्माल्य कुंडची सोय करण्यात आली होती. नागरिकांनी त्यात निर्माल्य टाकून प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला. विसर्जनासाठी पालिका प्रशासन सज्ज  आहे. पोलिस प्रशासनाकडून ठिकठिकाणी बंदोबस्त आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 sangli ganesh ustav ganesh visarjan