#BappaMorya बाप्पांसाठी "एनी टाइम मोदक' मशिन 

गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पुणे - आतापर्यंत आपण पैसे काढण्यासाठी व पाण्याची बाटली घेण्यासाठी एटीएम मशिनचा वापर करताना अनुभवले असेल. पण, आता चक्क मोदकही एटीएम मशिनमधून मिळू लागले आहेत. ही किमया केली आहे सहकारनगरमधील संजीव कुलकर्णी यांनी. त्यांनी आपल्या घरातील गणपती बाप्पासाठी "एनी टाइम मोदक' मशिन तयार केले आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद देण्यासाठी या मशिनचा वापर केला जात आहे. 

एखाद्या बॅंकेच्या एटीएमसारखे हुबेहूब दिसणारे हे मशिन असून, ज्याप्रमाणे कार्ड स्वाइप करून एटीएम मशिनमधून पैसे काढता येतात, त्याचप्रमाणे या मशिनसाठी बनविलेले विशेष कार्ड स्वाइप करून मोदक मिळवता येतो. हे कार्ड स्वाइप केल्यानंतर मशिनमधून मोदक असलेली डबी बाहेर येते. विशेष म्हणजे त्यासोबतच एटीएम मशिनमधून मिळते, तशी पावतीही मिळते. 

याबाबत कुलकर्णी म्हणाले, ""गेल्या 25 वर्षांपासून दर वर्षी मी माझ्या घरातील गणपतीसमोर असे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारत आहे. गेल्या वर्षापर्यंत मी माझ्या घरी येणाऱ्या मित्र, नातेवाइकांना हाताने मोदक द्यायचो; परंतु हा प्रसाद त्यांना ऑटोमॅटिक मिळायला हवा, असे मनात आले अन्‌ त्यासाठी हे मशिन तयार केले. दर वर्षी मित्र, नातेवाइकांशी चर्चा करून पुढील वर्षी काय देखावा करायचा?, हे ठरवतो. त्यानंतर वर्षभरात त्यासाठी लागणारे साहित्य जमा करतो अन्‌ देखावा साकारतो.'' 

कुलकर्णी यांनी आतापर्यंत गणपतीसाठी अगदी हुबेहूब दिसतील असे नारळ, उदबत्ती, कोयरी, मोबाईल यांसह अनेक वेगवेगळे देखावे तयार केले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 Any Time Modak Machine