Ganesh Festival : गणेशभक्तांची अखंड सेवा

Ganesh Festival :  गणेशभक्तांची अखंड सेवा

पुणे - गणेशोत्सवानिमित्त पुरोहितांचे बुकिंग, देखावे, मंडपातील सजावटीपासून ‘श्रीं’च्या स्वागतासाठी चांदी; तसेच लाकडी पालख्या अन्‌ रथावर फुलांच्या सजावटीसाठी बुधवारी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. कोणत्या दिवशी कीर्तन-प्रवचन ठेवायचे, जिवंत देखाव्यासाठी कलाकारांच्या तारखा, उत्सवातील उपक्रम, पुरस्कार वितरण यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांच्या नियोजनात सर्वच मंडळांचे कार्यकर्ते व्यग्र झाले होते.

गणेशोत्सवास आज (ता. १३) पासून सुरवात होत आहे. केवळ गणेश मंडळच नव्हे तर विविध समाजातर्फेही त्यांच्या कार्यालयांत ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्यामुळे विविध मंडळ व समाज संस्थांमार्फत ‘श्रीं’च्या उत्सवाची तयारी करण्यात येत होती. 

विजेसह सुरक्षिततेची व्यवस्था,  कार्यकर्त्यांना सूचना, बाउन्सरच्या तारखांचे बुकिंग, महिलांसाठी स्तनपान कक्ष, वाहतूक नियंत्रण, स्वयंसेवकांचे गट यांसारख्या कामाचे वाटपही विविध मंडळांचे कार्यकर्ते करत होते. ढोलताशा पथकांतर्फेही मिरवणुकीचे नियोजन आणि कोणत्या मंडळांत किती जणांची नेमणूक करायची, याचे नियोजन सुरू होते.  

सामाजिक घटना वा नैसर्गिक आपत्तीत कोणती काळजी घ्यावयाची, याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या जात होत्या. विद्युत रोषणाई, वैज्ञानिक विषयांवर प्रकाशझोत यांसारख्या विविध विषयांना स्पर्श करणारे देखावे व समाजप्रबोधनपर कार्य करण्याच्या उद्देशाने मंडळांच्या बैठका रंगल्या होत्या. उत्सवासाठीच्या आमंत्रण पत्रिकाही मंडळांमार्फत पाठविण्यात येत होत्या.  

गणरायाचे स्वागत उत्साहातच व्हायला हवे. त्यासाठी आम्ही महिनाभर अगोदरच तयारीला लागतो. शेवटच्या दिवसापर्यंत तयारी सुरू राहते. मात्र, हा मांगल्याचा उत्सव असल्याने तो साउंड सिस्टिमविरहित व्हायला पाहिजे. लहान आवाजात मंगलमय गाणी वाजविण्यावर मंडळाचा भर राहणार आहे. 
- पुष्कर तुळजापूरकर, विश्‍वस्त, नेहरू तरुण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com