विसर्जनासाठी ‘यिन’चे हात सरसावले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 September 2018

पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या ठिकाणी यिनच्या विद्यार्थ्यांनी मदत केली. मूर्तीदानासाठी नागरिकांनीही प्रतिसाद दिला व प्रदूषणमुक्त गणपती विसर्जन केले. 

यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, पिंपरी, आर. एम. डी कॉलेज ऑफ फार्मसी, चिंचवड व जेएसपीएमचे राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मूर्तीदानासाठी प्राचार्य सोहन चितलांगे, आकाश टेकवडे, भावना बिरारी, प्रतीक बंब, नीलेश चव्हाणके व सहकाऱ्यांनी नियोजनासाठी मदत केली. यासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर असोशियनचे गोपाळ बिरारी व गजानन चिंचवडे यांनी सहकार्य केले. सहायक पोलिस आयुक्त सतीश जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 yin member help for Ganesh immersion